भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक पवन सिंह सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पवन सिंहने आपली पत्नी ज्योती सिंह हिच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून, बिहारमधील आरा येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पवन सिंहने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याला आता पत्नी ज्योतीसोबत राहायचे नाही.
काय आहे नेमके प्रकरण?
पवन सिंह आणि ज्योती सिंह यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. मात्र, लग्नाच्या काही काळानंतरच त्यांच्यात खटके उडू लागले. ज्योती सिंहने पवन सिंहवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. दुसरीकडे, पवन सिंहने त्यांच्यातील वैचारिक मतभेद आणि एकत्र राहणे शक्य नसल्याचे कारण देत घटस्फोटाची मागणी केली आहे. न्यायालयाने या जोडप्याला काउन्सिलिंगसाठी वेळ दिला होता. मात्र ''मी निर्णयावर ठाम आहे'', असं पवन सिंह न्यायालयात म्हणाला.
विशेष म्हणजे, ज्योती सिंह ही पवन सिंहची दुसरी पत्नी आहे. पवन सिंहचे पहिले लग्न नीलम सिंह यांच्याशी झाले होते, मात्र लग्नाच्या काही काळानंतरच नीलम यांनी आत्महत्या केली होती. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पवन सिंहने ज्योती सिंहशी विवाह केला होता, पण आता हे दुसरे लग्नही मोडणार आहे. कारण पवन सिंह आता घटस्फोट घेण्यावर ठाम आहे.
पवन सिंह हा भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा स्टार मानला जातो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या चर्चांमुळे त्याचे चाहते थक्क झाले आहेत. आरा न्यायालयात पवन सिंह पोहचला असता, तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागला. सध्या न्यायालय या प्रकरणावर अंतिम निकाल काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Pawan Singh seeks divorce from wife Jyoti Singh after 8 years, citing irreconcilable differences. This marks his second failed marriage after his first wife's suicide. The court is reviewing the case.
Web Summary : पवन सिंह ने पत्नी ज्योति सिंह से 8 साल बाद तलाक की अर्जी दी, मतभेद बताए कारण। पहली पत्नी की आत्महत्या के बाद यह उनकी दूसरी असफल शादी है। अदालत मामले की समीक्षा कर रही है।