Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुसेना अधिकाऱ्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, लवकरच अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:03 IST

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने इंडियन एअर फोर्स अधिकाऱ्याशी थाटामाटात साखरपुडा केल्याची चर्चा आहे

सध्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आपापल्या पार्टनरशी साखरपुडा किंवा लग्न करुन आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत.अशातच सिनेसृष्टीतून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड टीव्ही अभिनेत्री वैष्णवी गौडाने (vaishnavi gowda) साखरपुडा केलाय. भारतीय वायुसेनेतील अधिकारी अनुकूल मिश्रा यांच्यासोबत वैष्णवीने साखरपुडा केला आहे. या कपलच्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या फोटोखाली वैष्णवीचं अभिनंदन केलं आहे. 

वैष्णवीने साखरपुड्याचे फोटो केले शेअर

वैष्णवी गौडाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्यासाठी वैष्णवीने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. याशिवाय हिरव्या रंगाचे दागिने परिधान केले असून तिच्यावर ते खूपच खुलून दिसत आहेत. याशिवाय अनुकूलने वैष्णवीच्या ड्रेसला मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली आहे. दोघांचाही जोडा एकमेकांना शोभून दिसत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात दोघांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.अनुकूल मिश्रा इंडियन एअर फोर्स अधिकारी आहेत. अनुकूल आणि वैष्णवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

कोण आहे वैष्णवी गौडा

कन्नड अभिनेत्री वैष्णवी गौडा ही एक प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. वैष्णवीला तिच्या अभिनय कौशल्यामुळे आणि विविधरंगी भूमिकांमुळे ओळकले जाते. वैष्णवीने भरतनाट्यम, कुचिपुडी आणि बेली नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे . २०१२ मध्ये 'देवी' या मालिकेतून तिने अभिनयाची सुरुवात केली. 'गिरगिटले' आणि 'ड्रेस कोड' या कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय'बिग बॉस कन्नड' सीझन ८ मध्ये सहभागी झाली होती. वैष्णवी आणि अनुकूल येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करतील.

टॅग्स :Tollywoodबॉलिवूडलग्न