Join us

एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:10 IST

'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी, नव्या चित्रपटात झळकणार 

Gulshan Devaiah : दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला कांतारा चॅप्टर-१ ची सध्या सगळीकडे चर्चा आहे.आधीच्या कांतारा चित्रपटाइतकाच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाची आगळीवेगळी कथा आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाला सगळ्यांची वाहवा मिळते आहे. त्यातील क्षेत्रपाल, पंजुर्ली आमि गुलिया, वराह अवताराभोवती गुंफलेलं कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.त्यामुळे देशभरातून या चित्रपटाला प्रेम मिळतं आहे.

कांतारा चॅप्टर-१ हा चित्रपट २०२२ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा: अ लीजेंड' चा प्रीक्वल आहे. यामध्ये रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.दरम्यान, या चित्रपटाने केवळ ऋषभ शेट्टीलाच केवळ प्रसिद्धी मिळाली नाहीतर त्यातील खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या गुलशन देवैय्याच्याही कामाचं कौतुक झालं. 'कांतारा चॅप्टर-१' च्या यशानंतर गुलशनला बिग बजेट प्रोजेक्टची ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून तो  पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. 'माँ इंती बंगाराम' असं या चित्रपटाचं नाव आहे.  या चित्रपटाची निर्मिती समंथा रूथ प्रभू करत आहेत. दरम्यान, त्याने चित्रपटातील त्याची भूमिका कोणतीही माहिती उघड केलेली नाही. 

'कांतारा चॅप्टर-१' पूर्वी गुलशन देवय्याने 'मर्द को दर्द नहीं होता','शिकारी','बधाई दो' आणि 'दुरंगा' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.त्याने 'कांतारा १' या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याचा हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट हिट ठरला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kantata Chapter-1 Actor Lands New Role After Hit Movie

Web Summary : 'Kantara Chapter-1' fame Gulshan Devaiah to debut in Telugu cinema with 'Maa Inti Bangaram,' produced by Samantha Ruth Prabhu. Devaiah gained recognition for his role in the Kannada film. He is known for his work in Hindi films before.
टॅग्स :गुलशन देवैयासमांथा अक्कीनेनीTollywoodसिनेमाकांतारा