Join us

वयाच्या ४४ व्या वर्षी लिव्हर इन्फेक्शन झाल्याने प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:59 IST

४४ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याने त्याचे चाहते आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

मनोरंजन विश्वातूल एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अभिनय (tamil actor abhinay) यांचं वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी निधन झालं आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून लिव्हर इन्फेक्शन आणि किडनी संबंधित आजाराने त्रस्त होते. उपचारादरम्यान आज पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनय यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येत होता, ज्यामुळे उपचारांमध्ये अडथळे येत होते. अशा परिस्थितीत, त्यांनी सोशल मीडियावर मदतीची विनंती केली होती. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. यात सुपरस्टार धनुषने त्यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती, तर अभिनेता बाला यांनीही त्यांची भेट घेऊन आर्थिक साहाय्य केले होते. परंतु अभिनय यांची प्राणज्योत मालवल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनय यांचा सिनेप्रवास

अभिनय यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात २००२ साली दिग्दर्शक कस्तूरी राजा यांच्या 'थुलुवधो इलमई' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात ते सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री शेरिन यांच्यासोबत दिसले होते. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर त्यांनी 'जंक्शन' (२००२), 'सिंगारा चेन्नई' (२००४), आणि 'पोन मेघलाई' (२००५) यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. पुढे अनेक सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीतही महत्त्वाच्या भूमिका केल्या. अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांसाठी डबिंग आर्टिस्ट (Dubbing Artist) म्हणूनही काम केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून काम नसल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अभिनय यांचा शेवटचा काळ एकाकीपणात आणि आर्थिक संघर्षात गेला. ते एकटे राहत होते आणि त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर तमिळ कलाकारांनी आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट्सद्वारे दुःख व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Actor Abhinay Passes Away at 44 Due to Liver Infection

Web Summary : Tamil actor Abhinay, 44, died from liver infection and kidney issues. He faced financial struggles during treatment despite industry support. His career began with 'Thulluvadho Ilamai,' and he acted in several films and worked as a dubbing artist. His death has brought grief to the Tamil film industry.
टॅग्स :मृत्यूTollywoodबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार