Join us

प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'फतेह' चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, सोनू सूदकडून खास ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:20 IST

'फतेह' चित्रपट प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

Sonu Sood : अभिनेता सोनू सूद हा व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त ओळखला जातो. सोनू सूदला 'गरिबांचा मसीहा' म्हटले जाते. तो गरजूंना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतो. सोनू सूदचा आगामी 'फतेह' (Fateh ) चित्रपट हा प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. : सिनेमागृहातसिनेमा पाहायला जायचं म्हणजे खिशाला मोठा फटका बसणार हे नक्कीच. पण सोनू सूदने चाहत्यांसाठी खास सवलत दिली आहे.  'फतेह' चित्रपट प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये  पाहता येणार आहे.

 'फतेह' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या तिकिटांची किंमत फक्त ९९ रुपये (Opening Day Tickets For Fateh At Rs 99 ) असेल, अशी घोषणा सोनू सूदने केली आहे. सोनू सूदने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, "२०२० मध्ये, जेव्हा संपूर्ण कोविड सुरू झाला, तेव्हा हजारो आणि लाखो लोक मदतीसाठी माझ्याकडे येऊ इच्छित होते. त्यांच्यासोबत सायबर फसवणूक होऊ लागली. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. मला हे अजिबात आवडलं नाही. म्हणून मी विचार करत होतो की तुमच्यासाठी बनवलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि थिएटरमध्ये कसा प्रदर्शित होईल? १० जानेवारी रोजी सिनेमा  प्रदर्शित होत आहे. तर तुमच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी 'फतेह'च्या तिकिटाची किंमत ९९ रुपये असेल". तसेच चित्रपटातून मिळणारा नफा हा  धर्मादाय संस्थेला दान केला जाणार आहे.  

सोशल मीडियावरील चाहते सोनूच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. एका युजरनं लिहिलं, 'आता आपली पाळी आहे! प्रत्येक कठीण काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली,  त्यांच्या स्वप्नांना आणि संघर्षांना सलाम करण्याची हीच वेळ आहे. सोनू सूदसोबत उभे राहा आणि दाखवा की माणुसकी अजूनही जिवंत आहे". तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, 'सर, तुमचा उपक्रम खूप चांगला आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला नक्कीच पाठिंबा देऊ".

'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन असणार आहे. आतापर्यंत चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज झाले आहेत आणि दोन्हीही धमाकेदार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला अॅक्शन आणि फायटिंगच्या बाबतीत कडक टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी