Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीच्या वेडिंग एन्ट्रीला दोन्ही भाऊ गायब?, 'या' अभिनेत्याने दिली नवरीची साथ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 16:32 IST

बहिणीच्या एन्ट्रीला लव आणि कुश सिन्हा कुठे गायब?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काल बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकली. ३७ व्या वर्षी तिने रजिस्टर मॅरेज केलं. सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या तेव्हा तिचे कुटुंबीय या लग्नाला विरोध करत असल्याच्याही चर्चा झाल्या. आंतरधर्मीय विवाह करत असल्याने तिचे आई वडील आणि दोन्ही भाऊ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. शेवटी हा तणाव मिटला. काल लग्नात शत्रुघ्न सिन्हांनी लेकीला आशीर्वाद दिला. पण यावेळी तिचे दोन्ही भाऊ गायब होते. बहिणीच्या एन्ट्रीलाही ते हजर राहिले नाहीत. शेवटी एका बॉलिवूड अभिनेत्याने सोनाक्षीच्या एन्ट्रीला हजेरी लावली.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीरने रजिस्टर मॅरेज करत सात जन्माच्या आणाभाका घेतल्या. त्यांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. सोनाक्षीने आईचीच ४४ वर्ष जुनी पांढरी साडी परिधान केली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसली. जहीरनेही व्हाईट कुर्ता घातला होता. शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या बाजूलाच उभे होते. त्यांनी दोघांना आशीर्वाद दिला. सोनाक्षीची एन्ट्री होताना फुलांच्या झालरखालून ती चालत येताना दिसली. यावेळी तिचे दोन्ही भाऊ झालक पकडण्यासाठी दिसले नाहीत. उलट अभिनेता साकीब सलीमने ते कर्तव्य पार पाडलं. साकीब सलीम हा अभिनेत्री हुमा कुरेशीचा सख्खा भाऊ आहे.

सोनाक्षीला जुळे भाऊ आहेत. त्यांची नावं लव आणि कुश अशी आहेत. ततर सिन्हा कुटुंबाच्या बंगल्याचं नाव 'रामायणा' आहे. सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केल्याने अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. इतकंच नाही तर तिच्या लग्नावरुन कुटुंबातील लोकांमध्येच नाराजी पाहायला मिळतेय.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडलग्नपरिवार