Join us
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच! सिद्धार्थ जाधवचा खास पेहराव, म्हणाला - 'रंगभूमीचा एक रंगकर्मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:06 IST

आपल्या सिद्धूची जोरदार चर्चा होतेय. 100वं नाट्य संमेलन याचं कारण ठरलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या तो बॉलिवूडमध्येही आपला जम बसवताना दिसतोय. सिद्धार्थ सोशल मीडियावरही चर्चेत आहे. तो नेहमीच आपल्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

नुकतेच सिद्धार्थने पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने खास पेहराव केला होता. त्याने  कुर्ता पायजमा घातला होता. कुर्तीवर चित्रपट, नाटकांची नावे लिहलेली होती. याचे काही खास फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहलं,'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या "१००व्या मराठी नाट्य संमेलनाच्या "निमित्ताने हा पेहराव...जो माझ्यासाठी तयार केला सायलीने'.

पुढे त्याने लिहलं,  'ज्या रंगभूमीने मला घडवलं त्या रंगभूमीचा एक रंगकर्मी, त्या रंगभूमीचा मी सेवक, म्हणून या नाट्य संमेलनात सन्मानाने सहभागी होताना खूप साऱ्या अनुभवाच्या शिकवणीतून मला आज काहीतरी सापडलंय हाच आनंद मोठा आहे माझ्यासाठी.रसिक मायबाप प्रेक्षकांचं प्रेम माझ्या पदरात टाकणाऱ्या या रंगभूमीचा, रंगकर्मींचा हा सोहळा मी मोठ्या सन्मानाने अभिमानाने अनुभवलाय हेच सांगायचंय तुम्हाला'. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या तो 'होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने अगदी कमी वेळात मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून सिद्धार्थने अभिनयात जम बसवला. त्याच्या स्वभावातून, वागण्याबोलण्यातून त्याचा साधेपणा कायम दिसून येतो. रणवीर सिंहसोबत त्याने सर्कस सिनेमात स्क्रीन शेअर केली आहे.  

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीमराठीमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी नाट्य संमेलनबॉलिवूड