Join us
Daily Top 2Weekly Top 5

शोएब मलिकची तिसरी पत्नी, पाक अभिनेत्री सना जावेदचं आहे भारताशी खास कनेक्शन, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 19:14 IST

Sana Javed India Connection: सना जावेदचा आणि भारताचा काय संबंध? वाचा

Sana Javed India Connection: पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री सना जावेद (Sana Javed)खूप लोकप्रिय आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने कायम पाकिस्तानी चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे. मात्र सध्या ती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoaib Malik) लग्न केल्यानेच जास्त चर्चेत आहे. शोएब आणि सानियाचा संसार मोडल्याचा तिच्यावर आरोप होत आहे. भारतातूनच नाही तर पाकिस्तानी नागरिकांनीही सानिया मिर्झाची बाजू घेत शोएब आणि सनाला दोषी ठरवलं आहे. पण तुम्हाला माहितीये का सना जावेदचंही भारताशी खास कनेक्शन आहे.

३१ वर्षीय सना जावेद पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे. शोएब मलिकसोबत तिचं पहिलं लग्न नव्हे तर दुसरं लग्न आहे. याआधी तिने 2020 साली पाकिस्तानी गायक उमैर जैस्वालसोबत लग्न केले होते. मात्र एका वर्षातच त्यांचा तलाक झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सना आणि शोएब मलिक गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला. भारतीय टेनिसपटू सानियाने वेळीच शोएबपासून खुला घेतला. तसंच त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. सना आणि शोएबच्या निकाहचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. दरम्यान सना पाकिस्तानी असली तरी तिचंही भारताशी कनेक्शन आहे.

सना जावेदचा जन्म  25 मार्च 1993 रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पाकिस्तानी घराण्यात झाला. तर ती पाकिस्तानातील कराची येथे लहानाची मोठी झाली. मात्र तिचे आईवडील यांचं मूळ भारतातील हैदराबाद आहे. तिच्या आईवडिलांचं कुटुंब हैदराबादचं आहे. यामुळे सना जरी पाकिस्तानी असली तरी तिचं भारताशी याप्रकारे नातं आहे. तिचा भाऊ अब्दुल्ला जावेद आणि बहीण हिना जावेद सुद्धा अभिनय क्षेत्रात आहेत. सनाचा लहान भाऊ अब्दुल्लाच्या जन्मानंतर तिचं कुटुंब जेद्दाहमधून पाकिस्तानात आलं. तिथेच सनाने मॉडेलिंगला सुरुवात केली. आधी तिने उर्दुतील काही टीव्ही कमर्शियल्स केले. 2012 साली तिने 'मेरा पहला प्यार' मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली. यानंतर तिच्या अभिनयाला सुरुवात झाली.

वर्कफ्रंट

सनाला'प्यारे अफजल' मालिकेत पहिल्यांदा मुख्य अभिनेत्रीचा रोल मिळाला. यातील तिने साकारलेली लुबनाची भूमिका सगळ्यांनाच आवडली. यानंतर तिने एकामागोमाग एक 'रंजिश ही सही', 'मीनू का ससुराल', 'हिसार ए इश्क','चिंगारी', 'कोई दीपक हो' या मालिका केल्या. 2017 साली तिने 'मेहरुनिस्सा वी लब यू' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. शिवाय अतिफ अस्लमच्या 'खैर मंगदा' म्युझिक अल्बममध्येही ती दिसली.

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानसानिया मिर्झाभारतलग्नघटस्फोट