Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:32 IST

शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होतोय आणि ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नुकतीच माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली आहे. आई आणि बहीणीसोबत ती दर्शनाला गेली. तिथे वैष्णोदेवीला जात असताना त्यांनी खेचरावरुन सवारी केली. मात्र शिल्पाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होतोय आणि ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी तिघीही गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहेत. प्रायव्हेट जेटमधून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यानंतर या तिघी खेचरावर स्वार होत चढताना दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला धारेवर धरलं आहे. शिल्पा 'पेटा' या संस्थेसोबत जोडली गेली आहे जी प्राण्यांसाठी काम करते. अशात शिल्पाने स्वत:चं ओझं खेचरावर टाकत अशाप्रकारे सवारी केल्याचं नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. तिचा व्हिडिओ आणि त्यावरील कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'इतकं फीट असण्याचा काय फायदा जर अशाच प्रकारे यात्रा करायची होती','खरोखरंच योगाचा काय फायदा जर तू माताच्या दर्शनासाठी चालत जाऊ शकत नाही तुला खेचराची गरज पडली. यापेक्षा घरुनच दर्शन घेतलं असतं','तुम्हा लोकांना नेहमीच फक्त कंफर्ट पाहिजे असतो','अॅनिमल हॅरेसमेंट','प्राण्यांना दु:ख देवून आनंद मिळणार नाही' अशा प्रकारच्या कमेंट्सला शिल्पा शेट्टीला सामोरं जावं लागत आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडमंदिरसोशल मीडियाट्रोल