Join us

"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:48 IST

Ramdev Baba On Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी(२७ जून) मृत्यू झाला. अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. यावर आता रामदेव बाबांनी त्यांचं मत मांडलं आहे. 

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी(२७ जून) मृत्यू झाला. ती फक्त ४२ वर्षांची होती. शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूमागचं नेमकं कारण किंवा तिला हृदयविकाराचा झटका कशामुळे आला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. यावर आता रामदेव बाबांनी त्यांचं मत मांडलं आहे. 

रामदेव बाबांनी एनडीटीव्हीशी बोलताना माणसाचं आयुष्य हे १०० वर्षांचं नसून २०० वर्षांचं असल्याचं म्हटलं आहे. पण, आपली जीवनशैलीमुळे ते कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "माणसाचं आयुष्य १०० वर्षांचं नाही. नैसर्गिकरित्या माणसाचं आयुष्य हे १५०-२०० वर्षांइतकं आहे. पण, आपण आपला मेंदू, हृदय, डोळे, लिव्हर यांच्यावर खूप प्रेशर टाकत आहोत. जेवढं माणसाने १०० वर्षांत खाल्लं पाहिजे तेवढं आपण २५ वर्षांतच खात आहोत. संतुलन कसं राखायचं हेच आपल्याला माहीत नाही. जर तुम्ही योग्य आहार आणि निरोगी आयुष्य जगत असाल तर तुम्ही १०० वर्षांपर्यंत म्हातारे होणार नाही. माझं वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. पण, योगा, आहार आणि चांगल्या जीवनशैलीमुळे मी हेल्दी आणि फिट आहे".

रामदेव बाबांना शेफाली जरीवाला आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आकस्मिक निधनाबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, "त्यांचं हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होता. लक्षणं ठीक होती पण सिस्टिमच खराब होती. तुम्ही आतून स्ट्राँग असणं गरजेचं आहे. तुम्ही जीवनात समाधानी असलं पाहिजे. तुमचे विचार, आहार, शारीरिक स्वास्थ उत्तम असणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं विशिष्ट वय असतं.  तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा हार्ट अटॅकसारखी परिस्थिती उद्भवते". 

टॅग्स :शेफाली जरीवालारामदेव बाबामृत्यूहृदयविकाराचा झटकाटिव्ही कलाकार