बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि डिझायनर गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आर्यन खानला लो प्रोफाइल रहायला आवडते आणि तो सोशल मीडियावरही फारसा सक्रिय नाही. तसेच इतरांप्रमाणे त्याचे फ्रेंड सर्कल बॉलिवूडशी संबंधित नव्हते. त्याचे मित्र अमेरिका आणि यूकेतील असून सामान्य कुटुंबातील आहेत. आर्यन खान शिक्षणासाठी या दोन्ही देशात गेला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यापासूनच, त्याचे हे मित्र त्याची आई गौरी खानच्या संपर्कात आहेत. तर काही जण त्याची बहीण सुहानाच्या संपर्कात आहेत.
मित्र घेतायत माहिती - शाहरुख खानच्या कौटुंबिक मित्राने सांगितले, की आर्यन खानचे मित्र वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाद्वारे त्याची माहिती घेत आहेत. खरे तर, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आर्यन खानने आपल्या अमेरिकन मित्रांसोबत रोड ट्रिपचा प्लॅन केला होता. मात्र, आता तो स्थगित झाला आहे. मित्राने असेही सांगितले की, आर्यन खानचे असे फार कमी मित्र आहेत, जे त्याच्या कुटुंबाशी आणि सर्कलशी जोडले गेले आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्याचा कुणी असा विशेष मित्र नाही. त्याचे मित्र अत्यंत सामान्य आहेत.
या प्रकरणाचे अपडेट्स घेण्यासाठी आर्यनचे मित्र, एकतर आर्यनची आणि गौरी अथवा त्याची बहीण सुहाना यांना फोन करत आहेत. एवढेच नाही, तर ते आपसातही यासंदर्भात चर्चा करून एकमेकांना माहिती देत आहेत.
आजही आर्यन खानचा जामीन अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. याच बरोबर अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. आर्यन खानच्या वकिलांनी आता जामिनासाठी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे आता सध्या आर्यनला आर्थर रोड जेलमध्येच राहावे लागणार आहे.
हेही वाचा -
- यामुळे शाहरुख खाननं आपल्या लाडक्या मुलाचं नाव ठेवलं 'आर्यन', मुलीशी आहे कनेक्शन
- "सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया