शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. शाहरुख गेली अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य करत आहे. शाहरुखने काही वर्षांपूर्वी सलग फ्लॉप सिनेमांचा एक काळ बघितला. त्यानंतर २०२३ मध्ये शाहरुखने तीन सुपरहिट सिनेमे दिले. आता शाहरुख करिअरच्या अशा शिखरावर आहे जिथे कोणी पोहोचू शकत नाही. शाहरुख सध्या आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने शाहरुखने #askSRK हे प्रश्न-उत्तरांचं खास सेशन घेतलं. त्यावेळी एका नेटकऱ्याच्या खोचक प्रश्नाला शाहरुखने कसं उत्तर दिलं बघा
शाहरुखने खोचक प्रश्नाला दिलं असं उत्तर
#askSRK या प्रश्न-उत्तरांच्या खास सेशनमध्ये एका नेटकऱ्याने किंग खानची खिल्ली उडवणारा एक प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने दिलेलं सडेतोड उत्तर चर्चेत आहे. नेटकऱ्याने सांगितलं की, 'भाई आता वय झालंय रिटायरमेंट घे! दुसऱ्या मुलांना पुढे येऊ दे" नेटकऱ्याने विचारलेल्या या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, "भाई, तुझ्या प्रश्नामधील बालिशपणा जेव्हा निघून जाईल तेव्हा काहीतरी चांगलं विचार. तोवर तू तात्पुरती निवृत्ती घे." अशा शब्दात शाहरुखने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देऊन त्याची बोलती बंद केलीय.
शाहरुखचं वर्कफ्रंट२०२३ मध्ये आलेल्या 'पठाण', 'जवान', 'डंकी' या तीन सिनेमांमध्ये शाहरुख दिसला. त्यानंतर शाहरुखने पुढील प्रोजेक्टसमध्ये मेहनत करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. शाहरुख सध्या 'किंग' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात शाहरुख प्रमुख भूमिकेत असून त्याची लेक सुहाना खान त्याच्यासोबत झळकणार आहे. याशिवाय जयदीप अहलावत सुद्धा खास भूमिकेत आहे. इतकंच नव्हे मुलगा आर्यन खानच्या Bas**ds of Bollywood या सीरिजमध्ये शाहरुख खास भूमिका करताना दिसणार आहे. त्याची घोषणाही लवकरच होईल.