Sanam Teri Kasam : 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) या चित्रपटाचं नाव सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाकिस्तानी अभिनेत्री मावर होकेन आणि हर्षवर्धन राणे (Harshwardhan Rane) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. परंतु त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. आता जवळपास ९ वर्षानंतर व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता काही वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. रि-रिलीजनंतर सनम तेरी कसम प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. अशातच चित्रपटाला मिळणारं प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनेता हर्षवर्धन राणेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला मिळणारं यश पाहून अभिनेता जॉन अब्राहम हर्षवर्धन राणेसाठी पोस्ट लिहिली आहे.
नुकतीच अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने हर्षवर्धनच्या या चित्रपटाला मिळणारं यश पाहून आनंद व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत अभिनेत्याने म्हटलंय, "शेवटी हर्षवर्धन राणे ही तुझ्या कामाची पोचपावती आहे". जॉन अब्राहमची ही इन्स्टाग्राम स्टोरी रि-शेअर करत हर्षवर्धने त्याचे आभार मानले आहेत. "थॅंक्यू सर, मी नेहमीच संयम आणि मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकलोय." असं त्याने म्हटलं आहे. शिवाय राणा दग्गुबती आणि अर्जुन रामपाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हर्षवर्धन राणेचं अभिनंदन केलं आहे.
'सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. २०१६ साली आलेला हा रोमँटिक हिंदी सिनेमा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेनसह मनीष चौधरी, मुरली शर्मा, अनुराग सिन्हा, विजय राज, सुदेश बेरी, कमल आदिब हे अनुभवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.