Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 18:57 IST

Samantha : साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा 'लव्हस्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समंथाने शेअर केला आहे.

ठळक मुद्देसमंथा आणि नागा चैतन्य विभक्त होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य लोकप्रिय दाक्षिणात्य जोडी विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. या घटस्फोटामागे अभिनेत्री साई पल्लवी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अलिकडेच समंथाने सोशल मीडियावर तिचं अक्किनेनी हे आडनाव हटवून टाकलं. त्यामुळे या चर्चांनी आता जोर धरला आहे. मात्र, या चर्चा सुरु असतानाच समंथाने नागा चैतन्यच्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा लव्हस्टोरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून नागा चैतन्यने तो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. विशेष म्हणजे हा ट्रेलर समंथानेदेखील शेअर केला आहे.

समंथाने लव्हस्टोरीचा ट्रेलर शेअर करत “विजेता !! संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा @ Sai_Pallavi92.. #LoveStoryTrailer, असं कॅप्शन समंथाने या पोस्टला दिलं आहे.

'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

दरम्यान, २०१७ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. परिणामी, ते दोघं लवकरच विभक्त होणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, यावेळी समंथाने नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत एकप्रकारे या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसेलिब्रिटी गणेश