Join us

दारु पिणं बंद केलं अन् बाहेरील पदार्थही खाणार नाही; सलमान खानचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

By देवेंद्र जाधव | Updated: July 11, 2025 11:13 IST

सलमान खानने दारुविषयी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून भाईजानच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. काय आहे कारण?

सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमानला आपण विविध सिनेमांत अभिनय करताना पाहिलंय. सलमानचे गेल्या काही वर्षातले सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. सलमान आता आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. हा सिनेमा म्हणजे 'बॅटल ऑफ गलवान'. सलमान खानचा हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. सलमान खानने या सिनेमासाठी दारु पिणं सोडलं आहे. याशिवाय मोठी तयारी केली आहे. जाणून घ्या.

सलमानची 'बॅटल ऑफ गलवान'साठी मोठी तयारी

अपूर्व लखियाच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमासाठी सलमान खानने सर्वप्रथम दारु पिणं पूर्णपणे बंद केलं आहे. याशिवाय 'सिकंदर' सिनेमाच्या रिलीजनंतर सलमानने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. 'फॅट टू फिट'साठी सलमान खान तयारी करत आहे. सलमान जिममध्ये जास्त वेळ काढत घाम गाळत आहे. सलमानने जंक फूड पूर्णपणे बंद केलं असून तो व्यवस्थित डाएट फॉलो करताना दिसतोय. अशाप्रकारे 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमासाठी सलमान जोरदार तयारी करताना दिसतोय. या सिनेमातील भूमिकेची गरज म्हणून सलमानला फिट दिसणं आवश्यक आहे. त्यामुळेच सलमान मेहनत करताना दिसतोय.

 

'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाविषयी

‘बैटल ऑफ गालवान’ हा सिनेमा १५ जून २०२० रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या झटापटीत भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले होते. सलमान खान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहेत. कर्नल संतोष बाबू यांनी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्वा लाखिया करत असून, याचं शूटिंग जुलै २०२५ पासून लडाखमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग, अंकुर भाटिया, हर्षिल शाह हे कलाकारही झळकणार आहेत. चित्रपटाला संगीत दिग्दर्शन हिमेश रेशमियाचे आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडदारुबंदी कायदाहेल्थ टिप्सआहार योजना