Join us

Richa Chadha Ali Fazal Daughter: रिचा चड्डा अन् अली फजलने दाखवली आपल्या लेकीची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 14:51 IST

रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे रिचा चड्ढा  (Richa chadha) आणि अली फजल (ali fazal) .  नुकतेच दोघे आई बाबा झाले आहेत. रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. रिचा आणि अली फजलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली. लक्ष्मीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.  रिचा आणि अलीच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच चाहत्यांना खास सरप्राईज या लोकप्रिय जोडीनं दिलं आहे. 

रिचा-अलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजकुमारीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. आपल्या लाडक्या लेकीच्या पायांचा एक सुंदर फोटो शेअर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठं collab झालं आहे. आम्ही खरोखर धन्य आहोत. आमची लेक आम्हाला खूप व्यस्त ठेवतेय. तुमचं प्रेम आणि आशीर्वादासाठी सर्वांचे आभार'. रिचा-अलीच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलायं. 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रानेही कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलंय. 

रिचा आणि अली 2013 साली 'फुकरे'च्या सेटवर भेटले होते. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत आहेत. सप्टेंबर 2022 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षीच्या सुरुवातीलाच रिचाने प्रेग्नंसीची गुडन्यूज दिली होती. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अली फजलची नुकतीच 'मिर्झापूर 3' वेबसीरिज रिलीज झाली. सध्या ही सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहे. तर रिचाही संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्ये झळकली होती. तिच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक झालं.  

टॅग्स :रिचा चड्डासेलिब्रिटीबॉलिवूडअली फजल