Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:17 IST

Reshma shinde: रेश्माने नुकतचं 'गुलाबी साडी' या गाण्यावर भन्नाट रील केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde).'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून रेश्मा घराघरात पोहोचली. रेश्मा सध्या घरोघरी मातीच्या चुली या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे याने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली असून नुकतंच या जोडीने ट्रेंडिंग रिल केला आहे. त्यांचा हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर गुलाबी साडी हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रिल्स केले आहेत. यामध्येच रेश्मा शिंदे सुद्धा मागे नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक ट्रेंड ती फॉलो करताना दिसते. त्यामुळेच यावेळी तिने गुलाबी साडी गाण्यावर व्हिडीओ शूट केला.

या रीलमध्ये रेश्माला अभिनेता सुमित पुसावळे याने साथ दिली असून त्यांनी एक रोमॅण्टिक व्हिडीओ शूट केला. विशेष म्हणजे त्यांचा हा अंदाज आणि ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना भावली आहे. त्यामुळे सध्या त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनरेश्मा शिंदेटिव्ही कलाकार