Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 16:29 IST

मी त्यांना कधी भेटलो तर...असं तो रागारागात म्हणाला.

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी 'हम आपके है कौन' सिनेमात साकारलेली 'भाभी'ची भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. या सिनेमामुळे रेणुका शहाणे लोकप्रियता मिळाली. तिने सिनेमात माधुरीच्या मोठ्या बहिणीची आणि सलमानच्या भाभीची भूमिका साकारली होती.  तर जेव्हा सर्वांची लाडकी भाभी पायऱ्यांवरुन खाली पडते तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. रेणुका शहाणेचा हा सीन पाहून त्यांच्या मोठ्या मुलाला चांगलाच राग आला होता.

सूरज बडजात्या यांच्या 'हम आपके है कौन' सिनेमाने 90 च्या दशकात धुमाकूळ घातला होता. एकही व्हिलन नाही,  फॅमिली ड्रामा, तगडी स्टारकास्ट आणि सुंदर गाणी यामुळे सिनेमा तुफान हिट झाला. सलमान आणि माधुरीची केमिस्ट्रीही लोकांना आवडली. रेणुका शहाणे एकदा एका मुलाखतीत म्हणाल्या,'माझ्या मुलांना सुरुवातीला मी अभिनेत्री आहे हे माहितंच नव्हतं. मी त्यांच्यासाठी त्यांची आईच होते. पण ते १०-१२ वर्षांचे असताना त्यांना शाळेतल्या मित्रांकडून समजलं की मी अभिनेत्री आहे. त्यांनी एकदा शाळेतून घरी आल्यावर आम्हाला हम आपके है कौन पाहायचा आहे असं सांगितलं.'

रेणुका पुढे म्हणाल्या,'सिनेमातील माझ्या मृत्यूचा प्रसंग पाहिल्यानंतर माझा मोठा मुलगा खूप अस्वस्थ झाला होता. त्याला दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा खूप राग आला होता. मी त्यांना कधी भेटलो तर...असं तो रागारागात म्हणाला. अर्थात तो लहान असल्याने भावनेच्या भरात तसं बोलला. मला मग त्याला समजून सांगावं लागलं होतं.'

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांना सत्येंद्र आणि शौर्यमान ही दोन मुलं आहेत. रेणुका शहाणे फिल्मइंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अभिनयाव्यक्तिरिक्त त्या दिग्दर्शनही करतात.

टॅग्स :रेणुका शहाणेहम आपके हैं कौनबॉलिवूडपरिवार