Join us

'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:15 IST

Bollywood song: हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.

90 च्या दशकात विशेष लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे  अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रवीना टंडन (Raveena Tandon). या जोडीने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. त्यामुळे त्यांची जोडी त्याकाळी हिट होती. त्यांचे असंख्य सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'मोहरा'. या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं तर आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने ऐकतात. विशेष म्हणजे या गाण्याची क्रेझ पार पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे.

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही पाकिस्तानी लोक टिप टिप बरसा पानी या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. इतंकच नाही तर त्यांनी या गाण्याचं नवीन पाकिस्तानी व्हर्जनही तयार केलं आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

Asim Burney या युजरने ट्विटर (एक्स) वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ लोकप्रिय ठरत असून अनेकांनी तो रिट्विट केला आहे.  हे गाणं सूर्यवंशी सिनेमातही रिक्रिएट केलं होतं. या गाण्यात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ झळकली होती. परंतु, रविनासोबतच्या गाण्याला जितकी लोकप्रियता मिळाली. तितकी लोकप्रियता कतरिनाला मिळाली नाही. 

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमाररवीना टंडनकतरिना कैफपाकिस्तान