अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सगळीकडे 'श्रीवल्ली' म्हणून लोकप्रिय आहे. 'पुष्पा २' मधून ती पुन्हा चाहत्यांवर भुरळ घालायला येत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा 'पुष्पा २' लवकरच रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर आला आहे. काल सिनेमाचा प्री रिलीज इव्हेंट चेन्नई येथे पार पडला. यावेळी रश्मिकाने तिला कोणाशी लग्न करायचं आहे यावर हसतच उत्तर दिलं आहे. श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे.
'पुष्पा २'च्या प्री रिलीज इव्हेंट काल चेन्नईत पार पडला. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, संगीतकार देवी प्रसाद आणि सिनेमाचे निर्माते उपस्थित होते. इव्हेंटमध्ये मजा मस्ती सुरु असताना होस्टने रश्मिकाला काही प्रश्न विचारले. 'तुला कसा मुलगा हवा आहे आणि तो फिल्म इंडस्ट्रीतलाच असेल की नाही?' यावर रश्मिका विजय देवरकोंडाचं नाव न घेता हसतच म्हणाली, "सगळ्यांनाच याचं उत्तर माहित आहे. मला माहित आहे तुम्हाला माझ्याकडून कोणतं उत्तर ऐकायचं आहे."
रश्मिका मंदानाच्या उत्तरानंतर एकच हशा पिकला. या इव्हेंटसाठी रश्मिका गुलाबी साडीत आली होती. तर अल्लू अर्जुन ब्लॅक आऊटफिटमध्ये होता. सिनेमात अभिनेत्री श्रीलीलाचं आटम साँग आहे. श्रीलीलाही यावेळी उपस्थित होती. संपूर्ण इव्हेंटमध्ये कलाकार आणि सिनेमाच्या टीमने धमाल केली आहे.
काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडानेही रश्मिकासोबतच्या डेटिंगवर भाष्य केलं होतं. त्याच्या रिलेशनशिपमध्ये स्टेटसबद्दल विचारलं असता तो म्हणाला होता, 'मी ३५ वर्षांचा आहे सिंगल असेन असं वाटतं का?'. विजय देवरकोंडा आणि रश्मिका 'डिअर कॉम्रेड', 'गीता गोविंदम' या सिनेमांमध्ये एकत्र दिसले आहेत.