रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही चाहत्यांची लाडकी जोडी. काही महिन्यांपूर्वीच दोघांच्या आयुष्यातील नवीन टप्पा सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'दुआ' असं ठेवण्यात आलं. लेकीच्या जन्मानंतर दीपिका बंगळुरुलाच गेली होती. आता सध्या ती मुंबईत असून नुकतेच दोघंही एका फंक्शनमधून बाहेर पडताना दिसले. मात्र यावेळी त्यांची लेक दुआ नव्हती.
लेकीच्या जन्मानंतर दीपिका खूप कमी वेळा माध्यमांसमोर आली आहे. तिने बंगळुरुमध्ये झालेल्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. यानंतर रणवीर-दीपिका विमानतळावरही दिले होते. तेव्हा दुआ त्यांच्यासोबत होती मात्र त्यांनी तिचा चेहरा माध्यमांसमोर दाखवला नाही. नुकतेच रणवीर-दीपिका एक लग्न अटेंड करुन बाहेर येताना दिसले. नवीनच पालक झालेले हे दोघंही आणखी रॉयल दिसत आहेत. रणवीरने व्हाईट शेरवानी घातली आहे. तर दीपिका गुलाबी लेहेंग्यात स्वत:च नवरीप्रमाणे सुंदर दिसत आहे. रणवीरचा हात धरुन दीपिका त्याच्या मागूनच चालताना दिसली. त्यांची झलक पाहण्यासाठी सर्वांची एकच गर्दी झाली. नंतर दोघंही कारमध्ये बसून निघून गेले. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
रणवीर दीपिका 'सिंघम अगेन'सिनेमात एकत्र दिसले होते. बाळाच्या जन्मानंतर आता दीपिका पुन्हा कामावर कधी परतणा याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दीपिकाकडे 'कल्की' चा सीक्वेल आहे. डिलीव्हरीनंतर आता ती याच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल अशी शक्यता आहे. शिवाय रोहित शेट्टीही तिच्यासोबत 'लेडी सिंघम' सिनेमा घेऊन येणार आहे. मात्र त्याबद्दल अद्याप अपडेट आलेले नाही.