Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'साठी लक्ष्मणाचा शोध संपला! हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार रणबीरच्या भावाची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 12:26 IST

'या' टीव्ही अभिनेत्याचं नशीबच फळफळलं, साकारु शकतो लक्ष्मणाची भूमिका

दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) श्रीरामाची भूमिका साकारणार आहे तर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. दिवसेंदिवस 'रामायण'च्या कास्टसंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी मेकर्सचा शोध आता थांबला आहे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता लक्ष्मणची भूमिका साकारेल अशी चर्चा आहे. कोण आहे तो अभिनेता?

'रामायण' हा नितेश तिवारींचा बिग बजेट सिनेमा असणार आहे. ओम राऊतचा 'आदिपुरुष' सिनेमा जबरदस्त ट्रोल झाल्यानंतर आता नितेश तिवारींसमोर तसं हे आव्हानच आहे. सिनेमाच्या स्टारकास्टवर भरपूर विचारविनिमय सुरु आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरची निवड तर निश्चित झालीच आहे. इतर स्टारकास्टबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. साई पल्लवी सीता तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे ही माहिती समोर आली आहे. आता लक्ष्मणाचा शोधही संपला आहे. टीव्ही अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. ई टाईम्सच्या वृत्तानुसार, टीव्हीवरचा हँडसम हंक रवी दुबे रणबीर कपूरच्या छोट्या भावाची भूमिका साकारु शकतो. 

रिपोर्टनुसार, रणबीर आणि साई पल्लवीच्या 'रामायण' सिनेमाचं एकूण शेड्युल 60 दिवसांचं असेल. या मायथॉलॉजिकल सिनेमाचं अर्ध शेड्युल मुंबई आणि बाकी लंडनमध्ये होणार आहे. सध्या रणबीर क्लीन शेव्ह लूकमध्येच जागोजागी दिसत आहे. तर साई पल्लवीने नुकतंच आमिर खानचा मुलगा जुनैदसोबतच्या 'महाराजा' सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. 

'जमाई राजा' फेम रवी दुबेने आतापर्यंत बातमीला दुजोरा दिलेला नाही. रवी दुबे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे.'लखन लीला भार्गव' वेबसीरिजमधील भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं होतं. २८ मिनिटांचा मोनोलॉग त्याने सादर केला होता. 

टॅग्स :रवि दुबेरणबीर कपूरसिनेमारामायणटिव्ही कलाकार