Join us

'रामायण' च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो समोर; पण रणबीर कपूरच गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 15:40 IST

'रामायण' चा सेट पाहिलात का?

नितेश तिवारींचा 'रामायण' (Ramayan) सिनेमा सध्या त्याच्या स्टारकास्टमुळे चर्चेत आहे. सिनेमात कोण कोण भूमिका साकारणार याबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत होती. आता अखेर सिनेमाचं प्रत्यक्षात शूटिंग सुरु झालं आहे. सेटवरचा पहिला फोटोही समोर आला आहे. नितेश तिवारींनी मुहुर्त पूजेसोबत रामायण च्या शूटिंगचा शुभारंभ केला. रणबीर कपूर सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत आहे साई पल्लवी सीता माता तर यश रावणाच्या भूमिकेत आहे. 

'रामायण' च्या सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे. भव्य असा सेट तयार करण्यात आला आहे. 'रामायण, पहिला दिवस.' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सिनेमासाठी रणबीर (Ranbir Kapoor) आणि यशचे (Yash) चाहते तर खूपच उत्सुक आहेत. शूटिंगला सुरुवात जरी झाली असली तरी अद्याप रणबीर, साई पल्लवी आणि यश आलेले नाहीत. सुरुवातीचे काही शॉट्स बॉडी डबलसोबत शूट करण्यात येत आहेत. सेटवरील एका क्रू मेंबरने हा फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रिपोर्टनुसार, रणबीर आणि साई पल्लवीच्या 'रामायण' सिनेमाचं एकूण शेड्युल 60 दिवसांचं असेल. या मायथॉलॉजिकल सिनेमाचं अर्ध शेड्युल मुंबई आणि बाकी लंडनमध्ये होणार आहे. सध्या रणबीर क्लीन शेव्ह लूकमध्येच जागोजागी दिसत आहे. तर साई पल्लवीने नुकतंच आमिर खानचा मुलगा जुनैदसोबतच्या 'महाराजा' सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. 

टॅग्स :रणबीर कपूररामायणसिनेमासाई पल्लवीबॉलिवूड