Join us

"तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे, स्त्रियांना तेथे...', राधिका आपटेचा टॉलिवूडवर निशाणा, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 08:56 IST

Radhika Apte: राधिकाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे (Radhika Apte).  उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर राधिकाने बॉलिवूडसह मराठी आणि तेलुगू इंडस्ट्रीतही आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. राधिका तिच्या अभिनयशैलीसोबतच बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर राधिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुषांचं वर्चस्व असल्याचं  म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर राधिकाचा एक जुना व्हिडीओ  व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याच्या अनुभवावर भाष्य केलं. इतकंच नाही तर तेथे पितृसत्ताक असल्याचंही तिने म्हटलं.

नेमकं काय म्हणाली राधिका?

"मी सगळ्यात जास्त संघर्ष कुठे केला असेल तर तो तेलुगू इंडस्ट्रीमध्ये केला. कारण, ती इंडस्ट्री अतिशय पितृसत्ताक आहे. थोडक्यात एक प्रकारे ती चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान आहे. तिथे स्त्रियांना ज्या पद्धतीने वागवलं जातं ते असह्य करणारं आहे. या सिनेमांमध्ये स्त्रियांची भूमिका म्हणजे 'पती हा देवासारखा आहे', असं म्हणणारी असते.  सेटवर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे वागवलं जातं. सिनेमातील अभिनेता इतर कलाकारांची विचारपूसही करत नाही. अभिनेत्याचा मूड खराब आहे. त्याला चहा प्यायचा आहे असं थेट सांगितलं जातं", असं राधिका म्हणाली.

 

पुढे ती म्हणते, "या इंडस्ट्रीत मी सतत संघर्ष केला आहे आणि त्यामुळेच मी तिथे काम करणं सोडून दिलं. मला असं वाटतं की हे फक्त माझ्यासोबतच तिकडे घडतं."

दरम्यान, राधिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एका व्यक्तीच्या अनुभवावरुन संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं किंवा लेबल लावणं योग्य नाही, असंही एका व्यक्तीने म्हणत तिला ट्रोल केलं आहे. राधिकाने ही मुलाखत राजीव मसंद यांना दिली होती.

टॅग्स :राधिका आपटेबॉलिवूडTollywoodसेलिब्रिटीसिनेमा