Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिस वर्ल्ड' झाल्यानंतर प्रियंकाची सिनेमात येण्याची इच्छा नव्हती, मधु चोप्रा यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:44 IST

सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर आपसूकच अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात येतात.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आज एक ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूड ते थेट हॉलिवूड पर्यंतचा प्रवास तिने केला. या प्रवासात तिला अनेक अडचणींना भेदभावाला सामोरं जावं लागलं. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री असूनही ती देखील गटबाजीला बळी पडली होती. तिला कॉर्नर केलं जात होतं. नुकतंच तिने बॉलिवूडतचा खरा चेहरा समोर आणला होता. प्रियंका मिस वर्ल्ड चा किताब जिंकली पण नंतर तिला बॉलिवूडमध्ये यायचंच नव्हतं असा खुलासा तिची आई मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी केला आहे.

सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर आपसूकच अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात येतात. मात्र प्रियंकाला हे करायचं नव्हतं. मधु चोप्रा सांगतात, 'मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ती मुंबईत आली. स्वाभाविकच आहे तिला सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण तिला चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हती. तिला शिक्षण घ्यायचं नव्हतं. पण आम्ही तिला सांगितलं की अशा संधी पुन्हा मिळत नाहीत.'

त्या पुढे म्हणाल्या, 'आम्ही प्रियंकाची खूप समजूत काढली. एक चित्रपट कर जर नाहीच आवडलं आणि तुझ्यासाठी हे चांगलं नाही असं वाटलं तर पुन्हा करि नको असं आम्ही तिला सांगितलं. ते लोक तुला जबरदस्ती घेऊन जाणार नाहीत. यानंतर मग तिने चित्रपटांची ऑफर स्वीकारली. पहिल्या कॉन्ट्रॅक्टवेळी ती खूप रडली होती. मी फक्त तुझ्यासाठी हे करत आहे असं ती म्हणाली पण जेव्हा पहिल्यांदा ती कॅमेऱ्यासमोर गेली त्यानंतर तिला तेच काम आवडायला लागलं.'

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडविश्वसुंदरीहॉलिवूड