उद्यापासून (२६ जुलै) 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व सुरु होतंय. या पर्वाची सर्वांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. या नवीन पर्वात सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे दिसणार नाहीये. याशिवाय जुन्या सीझनमधील भाऊ कदम, सागर कारंडे, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम हे कलाकारही 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनमध्ये दिसत नाहीयेत. 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनमध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव सर्वांना खळखळून हसवताना दिसणार आहे. यानिमित्त प्रियदर्शनने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
'चला हवा येऊ द्या'बद्दल प्रियदर्शन काय म्हणाला?प्रियदर्शनने सेटवरील गौरव मोरेसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करुन प्रियदर्शन कॅप्शनमध्ये लिहितो की, "गौरव मोरे तुझ्या तुझ्या नव्या आणि माझ्या जुन्या "इनिंग" ला खूप शुभेच्छा. कुशल, भारत, श्रेया सोबत तू आहेस त्यामुळे ह्याची खात्री आहे का शो तुफान चालेल. लोक भरभरून प्रेम करतील आणि आपणही आपल्या २५ नव्या दमदार कलाकारांसोबत उत्तम काम करू भरपूर मेहनत करू. बाकी तर तुला माहिती आहेच. मी व्यायव्य ला जातो, तू............ गौरव मोरे." प्रियदर्शनच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनची उत्सुकता
उद्या २६ जुलै पासून, चला हवा येऊ द्याचा नवीन सीझन दर शनिवारी आणि रविवारी, रात्री ९:०० वाजता फक्त झी मराठीवर बघायला मिळणार आहे. या शोमध्ये गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे कलाकार झळकणार आहे. डॉ. निलेश साबळेच्या ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. सर्वांना 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वाची उत्सुकता आहे.