Join us

प्रिती इज बॅक! 'लाहोर 1947' च्या शूटिंगला सुरुवात, शेअर केला सेटवरील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:46 IST

बऱ्याच वर्षांनी प्रिती आणि सनी देओलची जोडी स्क्रीनवर झळकणार आहे.

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा (Preity Zinta) अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आमिर खानचा निर्मिती असलेला 'लाहोर 1947' सिनेमात प्रिती मुख्य भूमिकेत आहे. तर सनी देओल मुख्य अभिनेता आहे. यामुळे प्रिती आणि सनीची जोडी अनेक वर्षांनी पु्न्हा बघायला मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी प्रिती लग्नानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली होती. आता 'लाहोर 1947' मधून ती कमबॅक करत आहे.

९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री प्रिती झिंटाने 1998 साली 'दिल से' सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रितीच्या सौंदर्यावर आणि तिच्या गालावरील खळीवर प्रेक्षक फिदा झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रिती मुंबईतच आहे. लाहोर 1947 चं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत. कालच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. प्रिती झिंटाने संतोषींबरोबरचा सेल्फीही पोस्ट केला. तसंच पहिल्या दिवशीचा सेटवरील क्लॅपबोर्ड दाखवत तिने शूटिंग सुरु झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. 

या सिनेमातून आमिर खान आणि सनी देओल पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आमिर मात्र केवळ निर्मात्याच्या भूमिकेत आहे. फिल्मचं शूट सध्या एका हवेलीत होत आहे. प्रितीला इतक्या वर्षांनी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी प्रितीचे आयपीएल दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. या वयातही ती किती यंग दिसतेय यावर फॅन्सचा विश्वासच बसत नव्हता. 

प्रिती झिंटाने 2016 साली परदेशी बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केले. 2021 साली सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई झाली. जीन तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. जीन गुडइनफ लॉस एंजेलिसमध्ये फायनान्स अॅनालिस्ट आहेत. 

टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडसिनेमा