डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरुन आहे. हार्दिक-नताशाने काडीमोड घेतल्यानंतर आता धनश्री आणि चहल सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. शिवाय चहलने फोटोही डिलिट केले आहेत. अनेकांनी धनश्रीलाच यासाठी जबाबदार धरलं आहे. तसंच तिचा 'झलक दिखला जा'मधील कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबतचा (Pratik Utekar) फोटो व्हायरल करत यामुळेच घटस्फोट झाला अशी चर्चा सुरु झाली. यावर नुकतंच धनश्रीने सर्वांना रोखठोक उत्तर दिलं आहे. तर आता प्रतीक उतेकरनेही सोशल मिडिया पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे.
२०२३ साली धनश्री वर्मा आणि प्रतीक उतेकरचा एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये दोघंही एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसून येतोय. तेव्हाच या फोटोची निगेटिव्ह चर्चा झाली होती. त्यांच्या अफेअर आहे असंही बोललं गेलं. आता जेव्हा धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाची चर्चा आहे तेव्हा तो फोटो पुन्हा व्हायरल होत आहे. यानंतर प्रतीक उतेकरने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'केवळ एक फोटो पाहून हे जग खोट्या गोष्टी बनवायला, कमेंट करायला आणि मेसेज करायला फारच रिकामं आहे. मोठे व्हा रे!"
याशिवाय धनश्रीनेही या सर्व चर्चांवर मौन सोडत भाष्य केलं. 'मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे, तथ्य तपासणीशिवाय लोक माझ्या विरोधात लिखाण करत आहेत. द्वेष पसरवला जातोय. चेहरा नसलेल्या ट्रोलर्सकडून माझ्या प्रतिष्ठेची चारित्र्यहनन केलं जाणं अस्वस्थ करणारे आहे', असं ती म्हणाली.
कोण आहे प्रतीक उतेकर?
प्रतीक उतेकर डान्स कोरिओग्राफर आहे. तो 'डान्स दिवाने' आणि 'नच बलिए' चा विजेताही राहिला आहे. त्याने सलमान खान, माधुरी, नोरा फतेही यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे.