Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलदार 'बाहुबली'! प्रभासकडून जिम ट्रेनर लक्ष्मणला खास सरप्राइज, गिफ्ट केली ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 09:16 IST

प्रभास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याचं एका खास गोष्टीमुळे सोशल मीडियातून कौतुक केलं जातंय.

प्रभास इंडस्ट्रीतील अशा निवडक कलाकारांपैकी आहे जो केवळ स्क्रीनवरच हिरो असतो असं नाही तर रिअल लाइफमध्येही हिरो ठरतो. प्रभास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याचं एका खास गोष्टीमुळे सोशल मीडियातून कौतुक केलं जातंय. अभिनेता प्रभासने त्याच्या जिम ट्रेनरला चक्क ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर वेलर कार गिफ्ट केलीय. जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभासच्या फिटनेसवर काम करत आहे आणि प्रभास त्याला त्याच्या लाइफमधील स्पेशल पर्सन मानतो.

प्रभासचा जिम ट्रेनरर लक्ष्मण रेड्डी हा २०१० मध्ये मिस्टर वर्ल्ड राहिलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्रभास लक्ष्मणच्या फॅमिलीसोबत कार देताना फोटो सेशन करतानाही दिसत आहे. फॅन्सचं मत आहे की, प्रभासचं ट्रान्सफॉर्मेशन बघून हे सहजपणे म्हटलं जाऊ शकतं की, त्याचा जिम ट्रेनर हे गिफ्ट डिझर्व्ह करतो.

प्रभासचा ट्रेनर लक्ष्मण पुन्हा एकदा त्याच ट्रेनिंग सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या 'आदिपुरूष' सिनेमाची घोषणा झाली. त्यात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमात त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर सर्वाचं लक्ष असेल. दिग्दर्शक ओम राऊतने दिग्दर्शित केलेला प्रभासचा हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन आहे. पण त्याआधी प्रभास आणि पूजा हेगडेचा 'राधे श्याम' सिनेमा रिलीज होणार आहे.

हे पण वाचा :

Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार?

प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका

प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?

टॅग्स :प्रभासबॉलिवूडTollywood