Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, मिस्ट्री मॅनसोबतचा शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:30 IST

नुकतेच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीनं  ती प्रेमात असल्याचं सांगितलं आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. तर अनेकांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. नुकतेच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीनं  ती प्रेमात असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिनं मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

दाक्षिनात्य अभिनेत्रीनं तिच्या बॉयफ्रेंडचा हातात हात धरलेला फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लॉक इमोजी शेअर केलं. हा फोटो आता व्हायरल झाला आहे. व्हायरल पोस्टमध्ये अभिनेत्री तिच्या लग्नाच्या प्लॅनचे संकेत दिले आहेत. मात्र, अभिनेत्रीने तिच्या जोडीदाराचे नाव किंवा लग्नाची तारीख उघड केलेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण. तर ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री सुनैना आहे.  

तिच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. सुनैनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. पण आता मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये काम करते. अभिनेत्रीने अनेक हीट चित्रपट दिले आहेत.  नुकतीच ती 'रेजिना' चित्रपटात दिसली होती. तिला 'नीरपरवई' मधील कामसाठी 'फिल्मफेयर पुरस्कार' मिळालेला आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीलग्नसोशल मीडिया