Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:27 IST
1 / 10सध्या रणबीर कपूरचा animal हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे या सिनेमातील प्रत्येक कलाकार नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत आहे.2 / 10७५६ कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या सिनेमात रणबीरशिवाय, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.3 / 10सध्या नेटकऱ्यांमध्ये या सिनेमातील बॉबीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता सौरभ सचदेव याने या सिनेमात आबिद उल हक ही भूमिका साकारली आहे.4 / 10आबिद उल हक ही भूमिका साकारणारा सौरभ खऱ्या आयुष्यात अॅक्टिंग कोच आहे. आजवर त्याने अनेक कलाकार घडवले आहेत.5 / 10सौरभने २००१ मध्ये उत्तराखंडमध्ये बॅरी जॉन यांचं इमेजो अॅक्टिंग स्कूल जॉइन केलं होतं. त्यानंतर त्याने याच अॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली. 6 / 10२००५ मध्ये त्याने मुंबई गाठली. येथे आल्यावर त्याने बॅरी जॉन अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनय शिकवण्यास सुरुवात केली. ११ वर्ष याच संस्थेत अभिनय शिकवण्याचं काम त्याने केलं.7 / 10सौरभने मनमर्जिया, हाऊसफुल ४ या सिनेमात काम केलं आहे. तसंच सेक्रेड गेम्स, काला, बंबई मेरी जान या वेबसीरिजमध्येही तो झळकला आहे.8 / 10सीक्रेड गेम्समध्ये सौरभने सुलेमान ईसाची भूमिका साकारली होती.9 / 10विशेष म्हणजे animal मधील भूमिकेसाठी तृप्ति डिमरीचं कौतुक केलं जात आहे. या तृप्तिला सौरभनेच अभिनय शिकवला आहे.10 / 10सौरभने वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, अर्जुर कपूर, ऋचा चड्ढा, कुब्रा सैत, दुलकर सलमान, आशा नेगी, ऋत्विक धनजानी, शक्ती मोहन अशा कितीतरी कलाकारांना अभिनयाचे धडे दिले आहेत.