1 / 7सध्या 'पंचायत ४' वेबसीरिजची चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजमधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक प्रेम करत आहेत. 'पंचायत ४'मध्ये साधे-भोळे आणि काहीसे अडाणी दिसणारे हे गावकरी रिअल लाईफमध्ये मात्र सुशिक्षित आहेत2 / 7 'पंचायत ४'मधील सर्वात जास्त शिकलेला कलाकार आहे तो म्हणजे सचिवजी. सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार हा IIT पास आऊट आहे. जितेंद्रने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पुढे अभिनय क्षेत्रात करिअर केलं.3 / 7सचिवजींच्या लाडक्या रिंकीला १२ वीच्या परीक्षेत ४२ मार्क्स मिळालेत, हे तिने एका एपिसोडमध्ये सांगितलं. रिंकी अर्थात अभिनेत्री सान्विकाने रिअल लाईफमध्ये इंजिनिअरींग केलंय.4 / 7प्रधानजी आणि मंजु देवी अर्थात अभिनेते रघुबीर यादव आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही रिअल लाईफमध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे. हा दोघांनीही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (NSD) शिक्षण घेतलं आहे. तर नीना गुप्ता यांनी संस्कृमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.5 / 7 'पंचायत ४'मधील साधाभोळा बिनोद मात्र खूप शिकला आहे. विनोद अर्थात अभिनेता अशोक पाठकने कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमधून मास्टर्सचं शिक्षण घेतलं आहे. तर बनराकस भूषण अर्थात अभिनेता दुर्गेश कुमारने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय श्रीराम सेंटर परफॉर्मिंग आर्ट्समधून अभिनयाचं सर्टिफिकेट त्याने मिळवलंय.6 / 7 'पंचायत ४'मधील क्रांती देवी अर्थात अभिनेत्री सुनिता राजवर यांनीही रिअल लाईफमध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे. सुनिता यांनी १९९७ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ आर्टसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय.7 / 7 'पंचायत ४'मध्ये उपप्रधान प्रल्हाद अर्थात अभिनेता फैसल मलिकने बी.कॉममध्ये शिक्षण घेतलं. पुढे अभिनयाच्या प्रेमापायी फैसल मुंबईत आला. तर सचिवजींचा साहाय्यत विकास अर्थात अभिनेता चंदन रॉयने भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) मधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवली आहे.