Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vanita Kharat : 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:42 IST

1 / 9
'महाष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात सध्या प्रचंड आनंदात आहे. यंदा वनिताचे शुभमंगल असल्याने तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
2 / 9
वनिता खरातने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. आता दोघेही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकत आहेत.
3 / 9
'सुमित लोंढे' असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. २०२२ वर्ष संपत असतानाच दोघांनी जाहीरपणे आपल्या प्रेमाच्या नात्याची कबुली दिली होती. दोघांनी जोडीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता
4 / 9
तर वनिताने नुकताच प्रिवेडिंग फोटोशूटमधील एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही ओलेचिंब झाले आहेत आणि kiss करताना दिसत आहेत. 'गुपित मौनांचे नजरेस कळावे,ओठांचे मग चुंबन व्हावे' असे कॅप्शन दिले आहे.
5 / 9
आता वनिताने प्रिवेडिंगचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये दोघेही खूप रोमॅंटिक झाले आहेत. आधी KISS आणि आता वनिता सुमितच्या मिठीत असून सुमित दंग झाला आहे.
6 / 9
'बोलक्या प्रश्नांनी साऱ्या कवेतच निरुत्तर व्हावे, गंध दरवळावा प्रेमाचा आपणही मग अत्तर व्हावे' असे गोड कॅप्शन दिले आहे.
7 / 9
तर हे कपल ओले चिंब होत एकमेकांच्या मिठीत गुंग झालेला आणखी एक फोटो तिने पोस्ट केला आहे. वनिताने अबोली रंगाची साडी नेसली आहे तर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तर सुमितने पांढरा शर्ट घातला आहे. कवेत तुझ्या शीण सारे सरावे, निसटूनी स्वतःतून, तुझ्यात उरावे असे कॅप्शन तिने दिले आहे.
8 / 9
अभिनेत्री स्पृहा जोशी तर या फोटोंवर फिदाच झाली आहे. स्पृहाने अग्ग आणि हार्ट्स असे कमेंट केले आहे. तर मराठी सिनेसृष्टीतील इतरही कलाकारांना वनिताचे हे फोटो खूपच आवडले आहेत.
9 / 9
वनिता सध्या सोनी मराठी वरील 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेत राधा मावशी ही भूमिका साकारत आहे. तर सुमित लोंढे हा व्हिडिओ क्रिएटर आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रावनिता खरातलग्नव्हायरल फोटोज्सोशल मीडिया