Join us

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:35 IST

1 / 7
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ला दिमाखात सुरुवात झाली आहे. यंदा भारतीय अभिनेत्रींच्या फॅशन आणि लुक्सकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, कियारा अडवाणी या सुंदरी कान्सची शोभा वाढवणार आहेत.
2 / 7
कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) लूक समोर आला. उर्वशीने ग्लॅमरस लुकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. गुलाबी रंगात तिने एन्ट्री घेतली. तिला पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या.
3 / 7
उर्वशीने तिच्या पहिल्या लूकसाठी गुलाबी ऑफ शोल्डर गाऊनची निवड केली. यासोबत तिने ड्रामॅटिक रफल्ड श्रग कॅरी केला होता. गुलाबी रंगाचीच हाय हील्स तिने घातली. या गुलाबी गाऊनमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं.
4 / 7
या हॉट गाऊनसोबतच तिने मॅचिंग अॅक्सेसरीज घातल्या आहेत. डोक्याला लावलेलं बँड ही लक्ष वेधून घेत आहे. पिंक लिपस्टीक आणि ग्लॉसी मेकअपमुळे वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
5 / 7
याआधीही उर्वशी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ओपनिंग सेरेमनीत सहभागी झाली होती. यावेळी तिला हॉलिवूड आयकॉन मेरिल स्ट्रीपसोबत स्टेजवर येण्याची संधी मिळाली. तो आनंद तिला शब्दातही व्यक्त करता येत नव्हता.
6 / 7
तर आणखी एका लूकमध्ये तिने लाल रंगाची निवड केली. यामध्येही लाल रंगाचा स्टायलिश ऑफशोल्डर गाऊन तिने परिधान केला. स्कीन टाईट गाऊनला असलेल्या पफ स्लीव्ह्जमुळे ड्रेसला स्टायलिश लूक आलेला दिसत आहे.
7 / 7
तर दुसरीकडे विश्वसुंदरी ऐश्वर्या रायनेही नेहमीप्रमाणे रेड कार्पेट गाजवलं. ब्लॅक ड्रेस, काळ्या रंगाचा डिझायनर लाँग गाऊन घालून ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली.
टॅग्स :उर्वशी रौतेलाकान्स फिल्म फेस्टिवलफॅशनव्हायरल फोटोज्सोशल मीडियाऐश्वर्या राय बच्चन