विनोदवीर Sunil Grover ची पत्नी आहे लाइमलाइटपासून दूर; सौंदर्याच्या बाबतीत आहे अभिनेत्रींच्या तोडीस तोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:36 IST
1 / 10'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रिय झालेला विनोदवीर म्हणजे सुनील ग्रोव्हर. या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.2 / 10गुत्थी, डॉक्टर मशहूर गुलाटी, रिंकू देवी अशा कितीतरी भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. 3 / 10छोटा पडदा गाजवणाऱ्या सुनीलने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनेता सलमान खानसोबत तो 'भारत' चित्रपटातही झळकला आहे.4 / 10प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सुनीलची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. त्यामुळे त्याच्याविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.5 / 10सुनीलचं लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील आहे. परंतु, सुनील फार क्वचित वेळा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.6 / 10सुनीलच्या पत्नीचं नाव आरती असून मुलाचं नाव मोहन आहे.7 / 10सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नसलेली आरती एक इंटेरिअर डिझायनर आहे.8 / 10इतर सेलिब्रिटींच्या पत्नीप्रमाणे आरतीला पार्टी, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फारसं आवडत नसल्याचं सांगण्यात येतं. 9 / 10सुनील ग्रोवरने त्याच्या करिअरची सुरुवात RJ म्हणून केली होती. हंसी के फुंवारे ही सीरिज त्याने चालवली होती. 10 / 10१९९५ मध्ये त्याने दुरदर्शनवरील फुल टेंशन या कॉमेडी शोमधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. १९९८ मध्ये प्यार तो होना ही था या चित्रपटातून त्याने बॉलिवूड पदार्पण केलं होतं.