करिअर सोडून नवऱ्यासोबत अमेरिकेत गेली, कौटुंबिक हिंसाचाराचा केला सामना; 'ही' अभिनेत्री आठवते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:37 IST
1 / 7२०११ साली आलेली 'स्टार प्लस'वरची नव्या मालिका आठवतेय? अभिनेत्री सौम्या सेठने (Soumya Seth) यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. सौम्या प्रेक्षकांना खूपच आवडली होती.2 / 7नंतर सौम्याने 'चक्रवर्ती अशोक सम्राट','दिल की नजर से खूबसूरत' या मालिकांमध्येही काम केलं. एमटीव्ही वेबशो मध्येही ती दिसली.3 / 7आपल्या करिअरच्या शिखरावर असताना सौम्याने लग्न केलं. २०१७ साली अमेरिकेत राहत असलेल्या अभिनेता अरुण कपूरसोबत ती विवाहबद्ध झाली. नंतर ती करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली.4 / 7तिला एक मुलगाही झाला. मात्र प्रेग्नंसीवेळीच सौम्याने कौटुंबिक हिंसाचाराचा सामना केला. तिला आत्महत्येचेही विचार यायचे पण लेकासाठी ती त्यातून सावरली. 5 / 7अरुणपासून संरक्षण मिळावं म्हणून सौम्या अमेरिकेच्या 'सेफहाऊस' मध्येही राहिली. तिथे हिंसा आणि छळ सहन करणाऱ्या महिलांना आश्रय दिला जातो. यानंतर २०१९ साली सौम्याने अरुणपासून घटस्फोट घेतला.6 / 7काही वर्षांनी सौम्याला दुसरं प्रेम मिळालं. आर्किटेक्ट शुभम चुहाडियासोबत तिने लग्नही केलं. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. म्हणूनच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.7 / 7सौम्या आता शुभम आणि लेकासोबत अमेरिकेतील वर्जिनिया येथे सुखी संसार करत आहे. शिवाय ती तिथे रिअल इस्टेटचा व्यवसाय करते. वयाच्या ३३ व्या वर्षी ती लायसंस होल्डर रियल्टर झाली आहे.