Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा, जान्हवीपेक्षाही 'या' टीव्ही अभिनेत्रीचे फॉलोअर्स जास्त, 22 व्या वर्षीच कमावते कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:09 IST

1 / 8
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची क्रेझ आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान एकामागोमाग एक स्टारकिड्स अभिनयात पदार्पण करत आहेत. पण दुसरीकडे यांच्याही टक्कर देणारी एक टीव्ही अभिनेत्री आहे. जिचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स या स्टारकिड्सपेक्षाही जास्त आहेत.
2 / 8
ती अभिनेत्री म्हणजे जन्नत झुबैर (Jannat Zubair). बालकलाकार म्हणून तिने अभिनयाला सुरुवात केली. खूप कमी वयात तिने प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. जन्नतचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी मुंबईत झाला. तिने पहिल्यांदा लोकप्रिय मालिका 'दिल मिल गये' मध्ये एक छोटी भूमिका केली.
3 / 8
जन्नतला खरी ओळख मिळाली ती 'काशी' आणि 'फुलवा' या दोन मालिकांमधून. या दोन्हीत तिने बालकलाकाराची मुख्य भूमिका साकारली होती.यानंतर महाराणा प्रताप मालिकेतही तिने काम केले.
4 / 8
२०१७ मध्ये जन्नतने 'तू आशिकी' मालिका केली. यातही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. जन्नतने 'खतरो के खिलाडी' मध्येही सहभाग घेतला आहे. याशिवाय राणी मुखर्जीच्या हिचकी सिनेमात तिने भूमिका केली. तर पंजाबी सिनेमा कुलचे छोले मधून तिने पंजाबी सिनेसृष्टीत डेब्यू केलं.
5 / 8
जन्नत अनेक ब्रँड्सची अँबेसिडर आहे. वयाच्या केवळ २२ व्या वर्षीच तिने हे यश मिळवलं आहे. फोर्ब्स अंडर ३० च्या यादीतही तिचं नाव आलं आहे. कॅटरिना कैफ सोबत ती एका जाहिरात कँपेनमध्येही झळकली आहे.
6 / 8
जन्नत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इतकी की तिने सारा जान्हवी, सुहाना, अनन्या या स्टारकिड्सलाही मागे टाकलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 46 मिलियन फॉलोअर्स आहेत़. तर साराचे ४२ मिलियन, जान्हवीचे 21.8 मिलियन आणि अनन्याचे 24.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
7 / 8
जन्नतकडे अनेक लक्झरी कार आहेत. 1.2 कोटी रुपयांची सिडॅन आणि जवळपास ९५ लाखांच्या दोन एसयूव्ही आहेत. तिला युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून कोट्यवधी रुपये मिळतात. तरुण पिढीसाठी ती खूपच प्रेरणादायक आहे.
8 / 8
जन्नतने अतिशय कमी वयात स्वत:चं घर खरेदी केलं आहे. तिला एक सख्खा छोटा भाऊ आहे ज्याच्यासोबत ती अनेकदा फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असेत. जन्नत तिच्या कुटुंबाच्या अतिशय जवळ आहे हे तिच्या सोशल मीडियावरुन कळतं.
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूडटेलिव्हिजनसारा अली खानअनन्या पांडेजान्हवी कपूर