Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला झाली ८ वर्ष, गुडन्यूज नाही म्हणून अभिनेत्रीला घरातूनच मिळाले टोमणे; नवऱ्याला आलं डिप्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 18:43 IST

1 / 9
प्रत्येक अभिनेत्रीला कधी लग्न, लग्न झालं तर फॅमिली प्लॅनिंग कधी या गोष्टी ऐकाव्या लागतात. अभिनेत्रीला तिच्या करिअरविषयी कमी तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुनच जास्त प्रश्न विचारले जातात. याच गोष्टीचा सामना प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करत आहे.
2 / 9
ही अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi). 'ये है मोहोब्बते' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. 2016 साली ती विवेक दहियासोबत (Vivek Dahiya) लग्नबंधनात अडकली. विवेक सुद्धा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय कपल आहे.
3 / 9
सध्या विवेक आणि दिव्यांकाला सतत गुडन्यूज कधी देणार हा प्रश्न विचारुन हैराण केलं जातं. नुकतंच तिने यावर थेट उत्तर दिलं आहे. कारण आता तिला कुटुंबातील सदस्यही हा प्रश्न विचारुन हैराण करत आहेत.
4 / 9
दिव्यांका म्हणाली, 'हे जरा आता जास्तच होतंय. गेल्यावर्षीपर्यंत सगळं ठीक होतं. आईवडील, चाहते कोणीच याबद्दल विषयही काढत नव्हतं. पण आता सगळेच हा विषय काढत आहेत. आता अचानक आम्हाला आईवडीलही टोमणे मारत आहेत.'
5 / 9
ती पुढे म्हणाली, 'आईबाबांचं म्हणणं आहे की खूप झालं आता. बरंच एन्जॉय केलं. पण मी हे सल्ले सकारात्मक पद्धतीने घेत आहे. मला हे अजिबातच निगेटिव्ह वाटत नाही.आम्हीही त्यांची मजा घेत आहोत. पण सध्या मी एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे त्यामुळे मी आताच बाळाचं प्लॅनिंग करु शकत नाही.'
6 / 9
दुसरीकडे विवेक दहिया 'झलक दिखला जा 11' मध्ये सहभागी झाला होता. इथे त्याने आपलं डान्स टॅलेंट दाखवलं. अनेक आठवडे तो या शोचा भाग होता. त्याने या शोसाठी खूप वेळ खर्च केला. मात्र मध्येच त्याची शोमधून एक्झिट झाली.
7 / 9
यावर दिव्यांका म्हणाली, 'झलक दिखला जा मधून बाहेर पडल्यानंतर तो खूप डिप्रेशनमध्ये आहे. आपण एखाद्या कामासाठी सगळं पणाला लावतो. पण निर्मात्यांसाठी हे एक बिझनेसच आहे.'
8 / 9
'मी त्याची पत्नी आहे त्यामुळे मी त्याची बाजू घेणारच. त्याने खूप छान परफॉर्मन्स दिले आहेत. त्याचा हा प्रवास आणखी जास्त असायला हवा होता.'असंही ती म्हणाली.
9 / 9
दिव्यांका त्रिपाठी सध्या कोणत्याही मालिकेत किंवा रिएलिटी शोमध्ये दिसत नाही. ती एका प्रोजेक्टवर काम करत आहे. 'अद्श्यम-द इंविस्बिल हिरोज'मध्ये ती दिसणार आहे. यामध्ये तिची अंडरकव्हर एजंटची भूमिका आहे. यासाठी दिव्यांका उत्सुक आहे.
टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहियाटिव्ही कलाकारपरिवार