Join us

Aditi Sharma : नवऱ्याला दिला धोका, वादाच्या भोवऱ्यात अडकली अभिनेत्री; घाबरुन मालकाने काढलं घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:56 IST

1 / 11
अपोलिना शो फेम आदिती शर्माने तिच्या पतीची फसवणूक केल्याची बातमी समोर आल्यापासून, ती चर्चेचा विषय बनली आहे.
2 / 11
आदिती सध्या भावनिकदृष्ट्या वाईट काळातून जात आहे. तिच्या घरमालकाने तिला नोटीस दिली असून तिला रातोरात नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हावं लागलं.
3 / 11
आदितीने याबद्दल इंडिया फोरमशी बोलताना सांगितलं की, तिचा पती अभिनीत कौशिकने केलेल्या आरोपांनंतर तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पण ती हिंमत हारली नाही.
4 / 11
'मी नुकतीच नवीन घरात शिफ्ट झाली आहे. सुदैवाने माझे पूर्वीचा घरमालक खरोखरच चांगले होते. त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली आणि मला राहण्यासाठी जागा दिली.'
5 / 11
'असं असूनही, मी घराचं भाडं आणि इतर सर्व खर्च वेळेवर देत होती. पण मला ताबडतोब घर रिकामं करावं लागलं. त्यांनी मला दोन दिवस दिले.'
6 / 11
'मी रात्री १:३० - २ वाजेपर्यंत अक्षरशः रस्त्यावर होते. माझा एक मित्र शूटिंगवर होता, माझे काही मित्र शहरात नव्हते. माझ्याकडे जागा नव्हती, कुठे जायचं हे मला माहित नव्हतं.'
7 / 11
'मी ज्या सोसायटीमध्ये राहत होते तिथे खूप काही चालू होतं. मला घर रिकामं करण्यास सांगण्यात आल्याने मी नवीन घरात राहायला गेले.'
8 / 11
'घरमालकाने मला फोन केला आणि सांगितलं की, मला घर रिकामं करावं लागेल. हे सर्व मध्यरात्री घडलं. मालकाने बातमी वाचली असल्याने मला घर रिकामं करावं लागेल असं सांगितलं.'
9 / 11
'घरमालक घाबरले होते. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, घाबरण्याचं काही कारण नाही, मी काहीही चुकीचं केलेलं नाही.'
10 / 11
'मला भीती वाटत नाही. अशा समस्यांना तोंड देणाऱ्या प्रत्येक मुली आणि मुलाला मी सांगू इच्छितो - तुम्ही हे सर्व करू शकता.'
11 / 11
'मला वाटतं की आपण काय अनुभवत आहोत हे मी आणि माझ्या कुटुंबाशिवाय इतर कोणीही समजू शकत नाही' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनघटस्फोटसेलिब्रिटी