Join us

"घराचं भाडं भरायलाही पैसे नव्हते अन्...", 'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताने सांगितला 'तो' संघर्षाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:21 IST

1 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे.
2 / 7
या मालिकेतील जेठालाल, दया, बबिता, अय्यर, तारक, अंजली, हाथी, सोढी अशा प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
3 / 7
दरम्यान, या मालिकेद्वारे अभिनेत्री मुनमुन दत्ता हे नाव घराघरात पोहोचलं. 'तारक मेहता...' मधील बबीता जी या पात्रामुळे तिला कलाविश्वात नवी ओळख मिळाली.
4 / 7
मुनमुन मुळची बंगालची असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मुनमुन लहानपणापासूनच गायन आणि नृत्यात पारंगत होती.
5 / 7
याचबरोबर दूरदर्शन आणि आकाशवाणीवर कार्यक्रमही करायची. परंतु तिचा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीचा प्रवास संघर्षमय राहिला आहे.
6 / 7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं. 'ई टाईम्स' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली,'माझ्या आईचं खूप लहान वयात लग्न झालं, त्यानंतर आईने तिचं संपूर्ण आयुष्य आमचं संगोपन करण्यात घालवलं. परंतु मुंबईत आल्यावर मला माझे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी मला पैशांची गरज होती.'
7 / 7
त्यानंतर मुनमुन म्हणाली ,' माझी आई वडिलांना न सांगताच मला पैसे द्यायची. त्या पैशांमुळे मला माझे भाडे भरण्यास, फोटोशूट करण्यास आणि ऑडिशन देण्यास मदत झाली. त्यावेळी मला आईने खूप सपोर्ट केला.' असं म्हणत अभिनेत्याने तिच्या संघर्ष काळातील आठवणी सांगितल्या.
टॅग्स :मुनमुन दत्ताटिव्ही कलाकारसोशल मीडिया