Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर समाधान! समीर चौघुलेंनी टिपले ईशा डेच्या लग्नातले हळवे क्षण, Unseen फोटो बघाच

By देवेंद्र जाधव | Updated: March 13, 2026 13:51 IST

1 / 7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डेचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं. ईशाच्या लग्नाची खूप चर्चा झाली. या लग्नात ईशाचे अनेक सहकलाकार उपस्थित होते.
2 / 7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील ईशाचे लाडके कलाकार प्रियदर्शिनी इंदलकर, रोहित माने, समीर चौघुले, वनिता खरात या कलाकारांनीही ईशाच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी समीर चौघुलेंनी स्वतः इन्स्टाग्रावर ईशाच्या लग्नातील हळवे क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत.
3 / 7
विशेष म्हणजे समीर चौघुलेंनी स्वतः या लग्नात मोबाईलच्या माध्यमातून ईशाचे फोटो टिपले. या फोटोंत ईशा अत्यंत आनंदी दिसत आहे.
4 / 7
याशिवाय एका फोटोत ईशाचे डोळेही पाणावलेले दिसत आहेत. समीर चौघुलेंनी ईशाच्या लग्नातील हे हळवे क्षण शेअर करत त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला आणि मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत
5 / 7
माझी लाडकी मैत्रीण इशा काल लग्न बंधनात अडकली..इशा आणि अभिषेक तुम्हा दोघांना भरभरून शुभेच्छा, अशा शब्दांत समीर चौघुलेंनी ईशा डेला शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 7
ईशा डेने ११ मार्च रोजी तिचा बॉयफ्रेंड अभिषेक खणकरसोबत लग्न केलं. अभिषेक खणकर हा गीतकार आहे. त्याने अनन्या चित्रपट गाणी तसेच झी मराठीच्या लक्ष्मी निवास, खुलता कळी खुलेना मालिकेचे शीर्षक गीत लिहिलं आहे.
7 / 7
गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये अभिनेत्री ईशा डेच्या लग्नाची चर्चा सुरु होती.अचानक सोशल मीडियावर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना सुखद धक्काच बसला.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी