'सपने सुहाने लड़कपन के'मधील गुंजन अडकली लग्नबंधनात, अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:02 IST
1 / 10 'सपने सुहाने लडकपन के'मधील गुंजन अर्थात अभिनेत्री रुपल त्यागी काल ५ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुपल त्यागीच्या लग्नाची चर्चा होती. 2 / 10रुपल त्यागीनं मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न केले. तिच्या लग्नाचे खास फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या समारंभात केवळ कुटुंब आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती होती. 3 / 10विशेष म्हणजे, रुपलने लग्नासाठी निवडलेले ठिकाण खूपच युनिक होते. ज्या हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले ते मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ आहे.4 / 10रुपलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, पार्श्वभूमीत मुंबई विमानतळाची धावपट्टी आणि विमाने स्पष्ट दिसत आहेत. लग्नासाठीच्या या हटके ठिकाणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.5 / 10रुपलच्या नवऱ्याचं नाव नोमिष असं आहे. तो अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. रुपल आणि नोमिष यांनी लग्नासाठी आकर्षक लूक केला होता. 6 / 10 रुपलने पारंपरिक लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. सोनेरी मांग टिक्का, सोन्याचे दागिने आणि लाल-पांढऱ्या बांगड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.7 / 10रुपलने तिच्या लेहेंग्यावर 'रुपल' आणि 'नोमिश'च्या नावाचे 'रूनोम' (#Roonom) असा हॅशटॅग असलेला कमरबंद बांधला होता.8 / 10 रुपल आणि नोमिषची भेट दोन वर्षांपूर्वी मुंबईत झाली होती. दरम्यान, येत्या ८ डिसेंबर रोजी रुपल आणि नोमिषचे रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे.9 / 10दरम्यान, काही दिवसांपुर्वी नोमिषनं गुडघ्यावर बसून रुपलजवळ प्रेम व्यक्त केलं होतं. नोमिषने रुपलच्या बोटात अंगठी घातली आणि तिला फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज केलं होतं. 10 / 10. या खास क्षणाचे फोटो शेअर करताना रूपलने कॅप्शनमध्ये Forever Yes, असं लिहिलं. या खास प्रसंगी रूपल त्यागीने लाल रंगाचा हॉल्टर नेक ड्रेस परिधान केला होता.