Join us

MHJ: काय? हास्यजत्रेचे कलाकार घेतात एवढं मानधन! पृथ्वीक प्रतापनेच केलेला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:46 IST

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. टीव्हीवर, मोबाईलवर सतत हास्यजत्रा पाहणारे अनेक प्रेक्षक आहेत.
2 / 9
समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात, शिवाली परब, प्रियदर्शिनी, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, ईशा डे अशा अनेक कलाकारांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे.
3 / 9
हास्यजत्रेचे तुमचे हे लाडके कलाकार किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. पृथ्वीक प्रतापनेच एकदा याचं उत्तर दिलं होतं. यासोबत त्याने मानधनाचं संपूर्ण गणितच मांडलं होतं.
4 / 9
या सगळ्यांचं मानधन नक्की किती असेल? यावर पृथ्वीक प्रताप म्हणालेला की, 'प्रत्येक कलाकाराला वेगवेगळी रक्कम मिळते. मग ही रक्कम प्रत्येक एपिसोडचे २० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतही जाते. कधीकधी ती ५ लाखांपर्यंत पण जाते.'
5 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये समीर चौघुले, अरुण कदम हे सीनिअर आहेत. तर गौरव मोरे, ओंकार राऊतसारखे नवीन कलाकारही आहेत ज्यांना हास्यजत्रेमुळे ओळख मिळाली.
6 / 9
'आपला सध्या प्रॉब्लेम झालाय की आपण सगळेच मोठ्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. आपल्याला वाटतं या व्यक्तीला ५ लाख मिळत आहेत मग आपल्याला का नाही.पण आपण हे लक्षात घेत नाही की कधीतरी त्या व्यक्तीने सुद्धा २० हजारांपासून सुरुवात केली असते.'
7 / 9
'अनेकांना महिना १५ हजार, १० हजारही मिळतात. ज्युनिअर आर्टिस्ट असतात त्यांना दिवसाला ८०० रुपये मिळतात. ते दहाच दिवस काम करतात. त्यामुळे अशा कमी मानधनातही लोक काम करतात. जेव्हा तुम्ही अगदी नवीन असता, पहिली डेली सोप असते तेव्हा तुम्हाला सांगतात दिवसाला दिड ते दोन हजार मिळतील.'
8 / 9
'आपण थोडे प्रसिद्ध झालो की अचानक कळतं की आज तुम्हाला दिवसाला पगार ३० हजार रुपये आहे. मग असं होतं की एवढे पैसे? किती दिवस काम करणार, ८/१० दिवस? मग ते दिवस खूप मोठे व्हायला लागतात कारण आपण १० दिवसात ३ लाख रुपये कमावलेले असतात. त्यामुळे यात अडकलं नाही पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या मानधनात घर सुरक्षित केलं पाहिजे.'
9 / 9
'मला आत्ता ६० हजार रुपये महिन्याला मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, २० हजार रुपये एसआयपी, १० हजार इन्श्युरन्स यात ४० हजार गेले. उरलेल्या २० हजारात मी आयुष्य जगतो. त्यात माझ्या कुटुंबाचा मेडिकल खर्च निघतो. उरलेले पैसे तुम्हाला कशात आनंद मिळतोय त्यात गुंतवा.'
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारपृथ्वीक प्रतापसमीर चौगुलेमराठी अभिनेता