Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali : 'चूक झाली, माफ करा आणि पदरात घ्या, प्राजक्ता माळीची पोस्ट; काय आहे नेमके कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:24 IST

1 / 10
सध्या अनेकांचा क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा चाहतावर्ग वाढतच चालला आहे. प्राजक्ताही तितकीच चाहत्यांसाठी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते
2 / 10
नुकताच संक्रांतीचा सण पार पडला. मात्र प्राजूचे फोटो काही दिसले नाहीत असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडलात असेल. अनेक कलाकारांनी काळ्या ड्रेसमधील, काळ्या साडीतील फोटो पोस्ट केले होते. मात्र दरवेळी आपल्या फोटोंनी घायाळ करणारी प्राजक्ता माळी कुठेच दिसली नाही.
3 / 10
तर आता प्राजक्ताने चाहत्यांची माफी मागितली आहे. संक्रांत झाल्यावर काळ्या कपड्यांवरचे फोटो टाकत आहे असं म्हणत तिने माफी मागितली आहे.
4 / 10
'प्राजक्तराज' हा नुकताच नवीन ज्वेलरी ब्रॅंड तिने सुरु केला आहे. याच कामात व्यस्त असल्याने श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाही. याचा आनंदही आहे त्यामुळे पदरात घ्या असं तिने पोस्ट मध्ये म्हणलं आहे.
5 / 10
प्राजक्ताने काळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत. यात प्राजू नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. कानात मोठ्या रिंग घातल्या आहेत. तर केस बांधलेले आहेत.तिचा हा लुक चाहत्यांना फारच आवडलाय
6 / 10
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. त्यात तिचे वेगवेगळे आऊटफिट खूपच चर्चेत असतात. तसंच तिच्या हास्यावरही चाहते फिदा असतात.
7 / 10
प्राजक्ताने नुकतेच व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. प्राजक्तराज नावाने तिने स्वत:चे ज्वेलरी ब्रॅंड सुरु केले आहे. या ब्रॅंडच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते.
8 / 10
प्राजक्तराज चे दागिने आता ती कार्यक्रमात घालताना दिसते. नुकतेच एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही तिच्या नेकलेसचे कौतुक केले.
9 / 10
प्राजक्ताने या नवीन ब्रॅंडचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपारिक मराठी साज असलेले असे हे दागिने आहेत.
10 / 10
प्राजक्ताची एकूणच लोकप्रियता वाढतच चालली आहे. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे १० लाख फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :मराठी अभिनेताप्राजक्ता माळीइन्स्टाग्रामसोशल मीडिया