Join us

लोकप्रिय ठरत असलेली 'अबोली' आहे तरी कोण? ; खऱ्या आयुष्यात आहे खूपच रॉकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 10:39 IST

1 / 8
छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकांच्याच गर्दीत सध्या 'अबोली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
2 / 8
मनात असंख्य गोष्टी असतात परंतु, त्या तिला कधीच मांडू दिल्या जात नाहीत अशी एकंदरीत अबोलीची कथा आहे.
3 / 8
या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी, अबोली ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती अत्यंत साधी, सालस अशी दिसून येत आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री नेमकी कशी आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
4 / 8
अबोली या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी गौरी कुलकर्णी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
5 / 8
गौरी उत्तम नृत्यांगनादेखील आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने स्टेज परफॉर्मेन्स करुन आपल्यातील नृत्याची झलक दाखवली आहे.
6 / 8
गौरी खऱ्या आयुष्यात प्रचंड रॉकिंग असल्याचं दिसून येतं. तिला अनेक नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडतं हे तिच्या फोटोवरुन दिसून येतं.
7 / 8
गौरीने Almost सुफळ संपूर्ण!! या मालिकेत काम केलं आहे.
8 / 8
गौरी सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमासेलिब्रिटी