Join us  

Sundara ManaMadhye Bharali Update: जहागीरदारांच्या घरी लवकरच होणार लतिकाचा गृहप्रवेश; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 1:23 PM

1 / 9
छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली.
2 / 9
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने आज प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
3 / 9
गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत अनेक नवनवीन वळणं आल्याचं पाहायला मिळालं. यात खासकरुन अभि आणि लतिकाच्या संसारात अनेक चढउतार आले.
4 / 9
एकेकाळी एकमेकांचा सहवास नको असलेले हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या रंजकदार वळणावर पोहोचली आहे.
5 / 9
लवकरच अभिमन्यु आणि लतिका पुन्हा लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे जहागीरदारांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
6 / 9
7 / 9
सध्या सोशल मीडियावर अभि आणि लतिकाच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघंही वधूवरांच्या वेशात दिसून येत आहेत.
8 / 9
सध्या सोशल मीडियावर अभिमन्यु आणि लतिकाच्या लग्नाच्या फोटोंची तुफान चर्चा आहे.
9 / 9
या फोटोमध्ये लतिकाचा मस्तीखोर स्वभाव दिसून येत आहे. हे दोन्ही कलाकार बॅक स्टेजवर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअक्षया नाईक