1 / 14मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे.2 / 14अनेक मालिका, रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली सुप्रिया पाठारेने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.3 / 14विनोदी,नकारात्मक वा गंभीर कोणतीही भूमिका असली तरीदेखील सुप्रिया पाठारे ती भूमिका लिलया पार पाडतात.4 / 14सुप्रिया पाठारेच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेऊयात.5 / 14आज अभिनयाच्या जोरावर यश, प्रसिद्धी अनुभवणाऱ्या या अभिनेत्री एकेकाळी प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले आहेत.6 / 14सुप्रिया पाठारे यांच्याप्रमाणेच त्यांची सख्खी बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यरत आहे.7 / 14अभिनेत्री अर्चना नेवरेकर साऱ्यांनाच ठावूक असतील. मात्र, त्या सुप्रिया पाठारे यांच्या सख्या बहीण आहेत हे फार मोजक्या लोकांना माहित आहेत.8 / 14अभिनेत्री अर्चना नेवरेकर या सुप्रिया पाठारे यांच्या छोट्या बहीण. 9 / 14अर्चना नेवरेकर यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहेत.10 / 14अर्चना नेवरेकर यांनी एकेकाळी आपल्या सौंदर्याच्या जोरावर अनेक तरुणांच्या मनावर राज्य केलं आहे.11 / 14सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अर्चना सामाजिक कार्यातही हरहुन्नरीने सहभाग घेत असतात.12 / 14अर्चना सोशल मीडियावर कायम सुप्रिया पाठारे यांच्यासोबतचे फोटो शेअर करतात.13 / 14अर्चना नेवरेकर यांनी केझन पिक्चर्सद्वारे 'करुया उद्याची बात'या पर्यावरणावर बेतलेल्या सिनेमाची निमिर्ती केली.14 / 14अर्चना नेवरेकर या चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लढाई', 'सुना येती घरा' आदी चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.