Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणताही गाजावाजा न करता मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील 'या' मंदिरात केलं लग्न; म्हणाली- "स्वप्न पूर्ण झालं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:17 IST

1 / 7
लग्न म्हटलं की सेलिब्रिटी गाजावाजा आणि प्रचंड खर्च करतात. परंतु एका मराठी अभिनेत्रीने मंदिरात साधेपणाने लग्न करुन जणू सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.
2 / 7
ही अभिनेत्री म्हणजे नंदिता पाटकर. नंदिताने काहीच दिवसांपूर्वी विपुल महागावकरसोबत दुसरं लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता नंदिताने खास फोटो शेअर करत मंदिरात लग्न केलं असल्याचा खुलासा केला.
3 / 7
नंदिता आणि विपुल या दोघांनी उत्तराखंड येथील त्रियुगीनारायण मंदिरात लग्न करुन त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं. नंदिताने सोशल मीडियावर खास फोटो आणि कॅप्शन शेअर करुन तिच्या भावना सांगितल्या.
4 / 7
'काही क्षण आपण ठरवतो, तर काही क्षण नियतीने आपल्यासाठी आधीच ठरवलेले असतात. आणि हा क्षण नक्कीच त्यापैकीच एक होता.'', असं लिहून नंदिताने मंदिरात लग्न करण्याविषयी पुढे खुलासा केला.
5 / 7
नंदिता पुढे लिहिते की, ''स्वतःला विसरुन एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं कधीच सोपं नसतं. पण हळूहळू, ते आपोआप घडत गेलं आणि आम्ही अशा ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, जिथे स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाचा उत्सव साजरा केला जातो.''
6 / 7
नंदिता शेवटी लिहिते, ''तिथे जाण्याचं स्वप्न आम्ही नेहमीच पाहिलं होतं, पण जेव्हा ते प्रत्यक्षात उतरलं तेव्हा सगळं काही स्वप्नवत वाटत होतं. त्रियुगीनारायण मंदिरात सर्व पवित्र विधींसह विवाहबंधनात अडकणं, हा शब्दांच्या पलीकडला अनुभव होता. खूप धन्य वाटतंय.''
7 / 7
अशाप्रकारे नंदिताने मनातल्या भावना शेअर केल्या. ९ एप्रिलला सोशल मीडियावर विपुलसोबतचे फोटो पोस्ट करुन नंदिताने लग्न केल्याची ही आनंदाची बातमी सर्वांना दिली.
टॅग्स :टेलिव्हिजनउत्तराखंडसेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकार