प्राईज मनी ५० लाख पण टॅक्स कट होऊन गौरव खन्नाला मिळणार फक्त 'इतके' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:26 IST
1 / 7गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'चं विजेतेपद पटकावलं. गौरव खन्नाला यावेळी सलमान खानच्या हस्ते चमचमती ट्रॉफी मिळाली. याशिवाय ५० लाख रुपये प्राईज मनी मिळाले. 2 / 7गौरव खन्नाला ५० लाख रुपये इतकी मोठी विजयी रक्कम मिळाली असली तरी ही सर्व रक्कम गौरवला घरी घेऊन जाता येणार नाही. या रकमेवर मोठा टॅक्स आकारला जाणार आहे.3 / 7भारतातील आयकर कायद्यानुसार, कोणत्याही शोमधून किंवा स्पर्धेतून जिंकलेल्या बक्षीस रकमेवर ३० टक्के दराने कर भरावा लागतो. त्यामुळे गौरवच्या प्राईज मनीवरही टॅक्स भरावा लागणार आहे.4 / 7गौरव खन्नाने जिंकलेल्या ५० लाख रुपयांवर ३० टक्के कर लागू होतो. याचा अर्थ ५० लाखांपैकी जवळपास १५ लाख रुपये गौरवला कर म्हणून भरावे लागतील.5 / 7गौरव खन्नाच्या विजयी रकमेतून टॅक्स कट झाल्यानंतर, त्याच्या हातात सुमारे ३४.४ लाख इतकी रक्कम मिळेल. एखादा स्पर्धक जेव्हा जिंकतो तेव्हा आयोजकांकडून ही रक्कम टॅक्सच्या माध्यमात सुरुवातीलाच कापली जाते.6 / 7अशाप्रकारे ५० लाख विजयी रक्कम मिळालेल्या गौरवलेला सुमारे साडे ३४ लाख इतकी रक्कम हातात मिळेल. बिग बॉस १६ मधील रनर अप शिव ठाकरेने याविषयी पहिल्यांदा खुलासा केला होता.7 / 7गौरव खन्नाने त्याचा शांत स्वभाव आणि हुशारीच्या जोरावर 'बिग बॉस १९'चं विजेतेपद पटकावलं. गौरव जिंकताच चाहत्यांनी त्याचं अभिनंदन करुन कौतुक केलं.