Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्स इंडिया डान्स' शोमध्ये चमकला, पण आता रस्त्यावर समोसे-कचोरी विकायची आली वेळ, 'त्या' एका घटनेने डान्सरचं आयुष्य बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:23 IST

1 / 7
'डान्स इंडिया डान्स' (DID) या गाजलेल्या डान्स रिअॅलिटी शोने राघव जुएलपासून, धर्मेशसह अनेक डान्सर्सना सुपरस्टार बनवले आहे. परंतु DID गाजवलेल्या एका डान्सरवर घरच्या परिस्थितीमुळे रस्त्यावर समोसे-कचोरी विकायची वेळ आली आहे.
2 / 7
हा डान्सर म्हणजे श्याम नाथ गोस्वामी. एकेकाळी डान्सच्या मंचावर चमकणारा हा कलाकार आज उदरनिर्वाहासाठी समोसे-कचोरी विकण्याचे काम करत आहे. श्यामच्या आयुष्यात असं काय घडलं?
3 / 7
श्याम नाथचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्याचे वडील हैदराबादमध्ये भजीची गाडी चालवायचे. एका खोलीच्या घरात राहणाऱ्या श्यामने शाळा सांभाळून वडिलांना त्यांच्या कामात मदत केली आहे.
4 / 7
सहावीत असताना घरात पहिल्यांदा टीव्ही आला आणि तिथूनच श्यामच्या मनात डान्सची आवड निर्माण झाली. 'ह्यूमंस ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, तो रात्री २ वाजेपर्यंत डान्सचा सराव करायचा आणि इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन डान्सचे व्हिडिओ पाहायचा.
5 / 7
वयाच्या १९ व्या वर्षी कॉलेज बुडवून त्याने 'डान्स इंडिया डान्स'साठी ऑडिशन दिले आणि टॉलिवूड स्टाईल डान्समुळे त्याची निवड झाली. निवड झाल्यानंतर तो मुंबईला आला, पण तिथेही त्याचा संघर्ष संपला नाही. मुंबईत आल्यावर पहिल्याच दिवशी त्याचं सामान आणि फोन चोरीला गेला. त्यामुळे बोरीवली स्टेशनवरच त्याला रात्री काढावी लागली.
6 / 7
या सर्व गडबडीत दुर्दैवाने DID च्या टीव्ही राउंडमध्ये श्याम नाथ बाद झाला. पण त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मागणीनुसार त्याला पुन्हा बोलावले गेले. इतकंच नव्हे त्याच्यासोबत एक एपिसोड शूट करण्यात आला, पण तो एपिसोड कधीच टेलिकास्ट झाला नाही.
7 / 7
मुंबईहून परतल्यानंतर श्यामच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्याच्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि संपूर्ण घराची जबाबदारी श्यामच्या खांद्यावर आली. घरातील आर्थिक समस्यांमुळे विजयवर समोसे-कचोरी विकायची वेळ आली. सध्या श्याम लग्नांमध्ये आणि कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये कोरिओग्राफी करून आपली डान्सची आवड जोपासत आहेत.
टॅग्स :नृत्यडान्स प्लस 4बॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार